पाच भावंडांच्या संघर्षातून उभा राहिलेला सौर ऊर्जा क्षेत्रातील यशस्वी प्रवास...
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या पाच भावंडांच्या जिद्दीला ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार प्रदान प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते गौरव छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी येथील ‘द ट्रिट इंपीरियल हॉटेल’ (The Treat Imperial Hotel) येथे Reseal.in या संस्थेच्या वतीने नुकताच अत्यंत दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सौर ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय व पथदर्शी कामगिरी करणाऱ्या PBR Construction & Renewable Energy Pvt. Ltd. या ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शून्यातून विश्व निर्माण कसे करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे PBR Construction & Renewable Energy Pvt. Ltd. ची वाटचाल आहे. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना, केवळ पाच भावंडांनी केलेल्या अफाट मेहनत, जिद्द आणि अतुट एकीच्या बळावर हा व्यवसाय उभा केला आहे. सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी आपली सुरुवात केली. आज ही कंपनी सौर ऊर्जा (Solar Energy) क्षेत्रा...