पत्नीची सतर्कता, पोलिसांची तत्परता; परळीत पतीचा जीव वाचला परळी : प्रतिनिधी.... पत्नीने वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने आणि पोलिसांनी काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतल्याने परळी शहरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा जीव वाचला. बुधवारी सकाळी सुमारे नऊ वाजता शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली. संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या संबंधित व्यक्तीने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतल्याची तसेच तो आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती त्याच्या पत्नीने तातडीने आपत्कालीन क्रमांक ११२ वर दिली. कॉल मिळताच पोलीस कर्मचारी गणेश येरडलावार यांनी संबंधित महिलेच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर येरडलावार आणि पोलीस जमादार पठाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तो उघडून घरात प्रवेश केला. घरात संबंधित व्यक्ती गंभीर अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी तत्काळ मदत करून त्याला सुरक्षित केले. त्यानंतर त्याच्याशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली.पत्नीने प्रसंगावधान राखून वेळीच पोलिसांना दिलेली माहिती आणि पोलिसांनी दाखविलेली तत्परता यामुळे सं...