पोस्ट्स

MB NEWS: video-अखेर नरभक्षक बिबटयाला मारण्यात वनविभाला यश!

इमेज
  अखेर नरभक्षक बिबटयाला मारण्यात वनविभाला यश! 11 जणांचे बळी घेणाऱ्या बिबट्याचा वन विभागाने शार्प शूटर द्वारा केला खात्मा करमाळ्यातील वांगी नं.4 रांखुडे वस्ती वर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीत ठार मारले.  आष्टी......  बीड - आष्टी, अहमदनगर, सोलापूर, जालना औरंगाबाद जिल्ह्यात 11 जणांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभागाच्या शार्प शुटरला शुक्रवारी ( दि .१८ ) यश आले आहे . करमाळा तालुक्यातील वांगीमध्ये या बिबट्याचा अंत करण्यात आला असून त्याला ठार मारण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला .  आष्टी तालुक्यातील तिघांना शिकार केल्यानंतर बिबट्याने करमाळा तालुक्याकडे आपला मोर्चा वळविला होता.या बिबट्याने त्या परिसरात धुमाकूळ घालत तीन ते चार जणांची शिकार केली होती.राज्यभरातील वन विभागाची पथके बिबट्याला ठार मारण्यासाठी करमाळा परिसरात मागील १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून तळ ठोकून होती. काल सायंकाळ पासून बिबट्याला मारण्याची प्रक्रिया सुरू होती .परवा सायंकाळी हा बिबटया बिटरगाव मध्ये आढळून आला.वन विभागाच्या सूत्रानुसार हा बिबटया उजनी च्या काठ...

MB NEWS:परळीकरांचे सहकार्य सदैव आठवणीत - पो. नि.बाळासाहेब पवार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पो.नि.सुरेश चाटे

इमेज
  परळीकरांचे सहकार्य सदैव आठवणीत - पो. नि.बाळासाहेब पवार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील - पो.नि.सुरेश चाटे परळी १८ (प्रतिनिधी) : संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परळीकरांनी नेहमीच सहकार्य केले असून परळीकरांची ओळख बाहेर जास्त बदनाम केली गेली. मी जेंव्हा संभाजीनगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला तेंव्हा मला परळीकरांनी जे सहकार्य केले ते मला सदैव आठवणीत राहील असे प्रतिपादन संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दि.१८ डिसेंबर २०२० रोजी निरोप समारंभ कार्यक्रमात केले. तर, नूतन पदभार स्वीकारलेले संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील. पो.नि.बाळासाहेब पवार यांची बदली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला झाल्याबद्दल त्यांना निरोप दिला. यावेळी त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ, पुष्पहार, शाल व फेटा बांधून व पेढे भरवून करण्यात आला.       पो.नि.बाळासाहेब पवार यांची बदली अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला झाली असून त्यांच्या का...

MB NEWS: *शासकीय निवासी शाळा, वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश*

इमेज
  *शासकीय निवासी शाळा, वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश*             मुंबई, दि. 18 : सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करावा यासाठी कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.             सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, समाजकार्य विद्यालय, अपंग शाळांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सह सचिव दिनेश डिंगळे आदी उपस्थित होते.             शासकीय निवासी शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहे. ही पदे मंजूर करताना केंद्रीय नवोदय विद्यालयाच...

MB NEWS:*युवक कार्यकर्ते नरेश सुरवसे यांचे दुःखद निधन*

इमेज
  *युवक कार्यकर्ते नरेश सुरवसे यांचे दुःखद निधन* परळी वैजनाथ दि.१६ (प्रतिनिधी)          शहरातील खंडोबा नगर परिसरातील युवा कार्यकर्ते नरेश सुरवसे (वय २८) सध्या नौकरी निमित्त पुणे येथे खाजगी दवाखान्यात नौकरी करत असताना सोमवारी (दि.१४) हार्ट अँटँकने निधन झाले.                       येथील युवक कार्यकर्ते नरेश सुरवसे यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी (दि.१६) सकाळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेश सुरवसे यांच्या मागे आई,वडील, पत्नी, एक मुलगा, बहीण असा परिवार आहे. परळीत झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता.त्यांच्या निधनामुळे खंडोबा नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

MB NEWS:पानगाव (जि. लातूर ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करणार* *- मंत्री धनंजय मुंडे*

इमेज
 * पानगाव (जि. लातूर ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करणार* -  मंत्री धनंजय मुंडे* मुंबई दि. 16. लातूर जिल्ह्यातील पानगाव ता. रेणापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.           मंत्रालयात पानगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकाच्या विकासा संदर्भात आयोजित बैठकीत श्री मुंडे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर चे पालकमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार धीरज देशमुख,  सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.             श्री. मुंडे म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी महाराष्ट्रात फक्त नागपूर, मुंबई व पानगाव येथेच ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पान...

MB NEWS: *डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश* *गेल्या तीन वर्षात दिलेल्या निधीचा हिशोब असमाधानकारक*

इमेज
 *डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश* *गेल्या तीन वर्षात दिलेल्या निधीचा हिशोब असमाधानकारक * मुंबई (दि. १६) ---- : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागांतर्गत २०१७ साली स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या कारभारात प्रचंड अनियमितता आढळल्याने याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.   या संस्थेच्या संचालक मंडळाची आज मंत्रालयात ना. मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.  सदर बैठकी दरम्यान सन २०१८-१९ चा लेखापरीक्षण अहवाल संचालक मंडळापुढे ठेवण्यात आला होता. TACS & कंपनी या सनदी लेखापाल संस्थेने केलेल्या लेखापरीक्षण ( २०१८-१९ ) मध्ये संचालक मंडळाने यामध्ये असलेल्या त्रुटींचे निरीक्षण नोंदवले. सदर संस्थेला मागील ३ वर्षात दिलेल्या रुपये १६ कोटी रुपये खर्चाचा हिशोब समाधानकारक नसल्याचे सनदी लेखापाल यांच्या अहवालात दिसून आले. यामध्ये निविदा प्रक्रिया न राबविता कामे देणे अथवा निविदा प्रक्...

MB NEWS:'त्या" चिमुकलीची आई सापडली.... !जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला मिळणार आधार

इमेज
 ' 'त्या" चिमुकलीची आई सापडली.... !जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला मिळणार आधार  परळी । प्रतिनिधी परळी शहरातील रस्त्यांवर एक बेवारस बालीका आढळून आली. नाथ टाॅकीज परिसरात आढळून आलेल्या बाळाला कोणीतरी वैफल्यग्रस्त महिला सोडून गेली असल्याची माहीती आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांनी दिली. त्या अनुषंगाने पोलीसांनी शोध घेत या बाळाच्या आईला शोधून पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान आई मानसिक रुग्ण असुन बाळ सुमारे दीड वर्ष वयाचे आहे परंतु ते कुपोषित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.जागरूक पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या तत्परतेने बाळाला व आईला आता आधार मिळणार आहे. परळीच्या रस्त्यांवर एक ते दीड वर्षांची एक चिमुकली रस्त्याच्या कडेला असल्याचे आढळून आली. उस्थितांनी तात्काळ परळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हेमंत कदम यांना कळविले. पोलिस पोहचेपर्यंत सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे, जी.एस.सौंदळे, पत्रकार धनंजय आरबुने, प्रशांत जोशी, दत्तात्रय काळे यांच्यासह अनेकांनी त्या बालकाला बिस्कीटे व पाणी देण्याबरोबरच स्वच्छ अंगोळ घालून कपडे बदलवले. सकाळच्या प्रह...