पोस्ट्स

MB NEWS-जोशी कुटुंबियांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

इमेज
  जोशी कुटुंबियांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन परळी (दि. 30) : परळी शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार भास्करराव जोशी यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले होते, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज भास्करराव जोशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी क्षेत्रोपाध्याय वामनगुरु जोशी व ना. मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्यासह जोशी कुटुंबातील सदस्यांचे ना. मुंडे यांनी सांत्वन केले  जुन्या पिढीतील अत्यंत अभ्यासू पत्रकार म्हणून भास्करराव जोशींची ओळख होती, पुणे येथे दै. तरुण भारत या वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. तद्नंतर परळी येतील साप्ताहिक जगमित्र चे ते संस्थापकीय संपादक होते. अलीकडच्या काळात अनेक पत्रकार-लेखकांना ते मार्गदर्शन करत.  भास्करराव जोशी यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रशांत हे ना. धनंजय मुंडे यांचे तब्बल 20 वर्षांहून अधिक काळापासून स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात. त्यामुळे साहजिकच जोशी कुटुंबियांशी ना मुंडे यांचा दीर्घकाळापासून स्नेह आहे.  स्व. भास्करराव जोशी हे जुन्या पिढीतील एक ज्येष्ठ पत्रक...

MB NEWS-महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू - धनंजय मुंडे* *महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा*

इमेज
 * महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू - धनंजय मुंडे* *महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा* बीड (दि. 30) ---- : महाराष्ट्र राज्य सरकारने व्यापक कोविड लसीकरण मोहीम हाती घेतली असून वय वर्ष 18 ते 44 मधील सर्व नागरिकांना आता मोफत लस देण्यात येणार आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या व्यापक लसीकरण मोहिमेस पाठबळ देण्यासह महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करू असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ना. मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. वातावरणात वाढती उन्हाची दाहकता आणि त्यात रोज वाढणारी संसर्गाची आकडेवारी एकीकडे चिंताजनक रूप धारण करत आहेत, त्यात आरोग्य विभागासह सर्व प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कष्ट घेऊन ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  जिल्हा वासीयांनी या प्रयत्नांना यश यावेत यासाठी आपली जबाबदारी ओळखून यंत्रणांना सहकार्य करणे आता अनिवार्य आहे. सर्वव्यापी लसीकरण मोहिमेत पात...

MB NEWS-लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का

इमेज
  लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का नवी दिल्ली : लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना  यांचं निधन झालं आहे. रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय अँकर होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी तसंच झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करुन ही धक्कादायक माहिती दिली. रोहित सरदाना हे झी न्यूजमधून आज तकमध्ये आले होते. मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून ते परिचीत होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सुधीर चौधरी हे ट्विटमध्ये म्हणतात, “आताच थोड्या वेळापूर्वी जितेंद्र शर्मांचा फोन आला. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून हात थरथर कापू लागले. माझा मित्र आणि सहकारी रोहित सरदानाच्या मृत्यूची ती बातमी होती. हा व्हायरस आमच्या इतक्या जवळच्या कोणाला घेऊन जाईल याची अजिबात कल्पना नव्हती. हा देवाचा अन्याय ...

MB NEWS-गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सेवा यज्ञ ; आयसोलेशन सेंटरच्या रूग्णांसाठी उद्यापासून नांव नोंदणी* *कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच भोजनाचीही होणार व्यवस्था*

इमेज
 * गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा सेवा यज्ञ ; आयसोलेशन सेंटरच्या रूग्णांसाठी उद्यापासून नांव नोंदणी*  *कोरोना बाधित महिला रूग्णांच्या परिवाराला घरपोच भोजनाचीही होणार व्यवस्था* परळी । दिनांक ३०। कोरोना संक्रमित रूग्णांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने 'सेवा यज्ञ ' सुरू करण्यात येत आहे. प्रतिष्ठानच्या आयसोलेशन (विलगीकरण) सेंटरसाठी रूग्णांच्या नांव नोंदणीला उद्या १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात होणार असून ३ मे पासून सेंटर मध्ये रूग्ण सेवेला सुरवात होणार आहे.    सध्या सर्वत्र कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून परळी व परिसरात रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा संकट काळात कोरोना रूग्ण व त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून रूग्णांना आयसोलेशन सेंटर व घरपोंच भोजनाची व्यवस्था केली आहे. *सुसज्ज आयसोलेशन सेंटर*  ------------------------------- शहराच्या शिवाजी चौकातील अक्षता मंगल कार...

MB NEWS-दुःखद वार्ता: पत्रकार अनुप कुसुमकर यांना पत्नीशोक

इमेज
दुःखद वार्ता: पत्रकार अनुप कुसुमकर यांना पत्नीशोक परळी l प्रतिनिधी मोहा येथील महाराष्ट्र विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे पत्रकार अनुप कुसुमकर यांच्या पत्नी अश्विनी कुसुमकर यांचे आज शुक्रवार दि.30 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 32 वर्षांच्या होत्या. पत्रकार अनुप कुसुमकर यांच्या पत्नी अश्विनी कुसुमकर यांना आज पहाटेच्या सुमारास झोपेत असतांनाच हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अश्विनी यांच्या पश्चात पती, मुलगा, सासूबाई, दिर,जाऊ असा मोठा परिवार आहे. कुसुमकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात MB NEWS परिवार सहभागी आहे.

MB NEWS-कोरोना निवारणावर आर्य सभेतर्फे वेब व्याख्यानमाला ‌ डॉ. लहाने यांच्यासह नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार ‌

इमेज
  कोरोना निवारणावर आर्य सभेतर्फे वेब व्याख्यानमाला  ‌  डॉ. लहाने यांच्यासह नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार ‌ . ‌ ‌परळी वैजनाथ (दि.२९)-------- ‌ सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या आजारावर मात करता यावी, यादृष्टीने नागरिकांचे प्रबोधन व्हावे व त्यांना जगण्याचे नवे बळ मिळावे, या उद्देशाने प्रांतीय आर्य प्रतिनिधी सभेतर्फे व्यापक स्तरावर वेब व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना जनजागृती अभियानांतर्गत दि.१ ते ७ मे २०२१ दरम्यान मोबाईलच्या झूम मीटवरुन दररोज सायंकाळी ६.०० वाजता योग, निसर्गोपचार, आयुर्वेद, होमिओपॅथी ,अलोपॅथी ,अध्यात्म , अग्निहोत्र आदी विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने संपन्न होतील. यात नामवंत शल्यचिकित्सक डॉ. विठ्ठल लहाने (लातूर), प्रसिद्ध होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील (लंडन), योगप्रशिक्षक प्रा. डी.एम. शेप (जिंतूर), निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. धनलाल शेंद्रे (नागपूर), यज्ञविशेषज्ञ डॉ. कमलनारायण आचार्य(रायपुर), वैदिक विद्वान पं....

MB NEWS-कोविड19 अपडेट* गुरुवार दि 29 एप्रिल 21

इमेज
 * कोविड19 अपडेट* गुरुवार दि 29 एप्रिल 21 अंबाजोगाई 215,  आष्टी 133,  बीड 320,  धारूर 84,  गेवराई 200,  केज 131 ,  माजलगाव 52,  परळी 119,  पाटोदा 75,  शिरूर 85,  वडवणी 56,  असे एकूण बीड जिल्ह्यात रुग्ण 1470 चाचणी 4902 निगेटिव्ह 3432 रुग्णवाढ दर 29.98% परळी शहर 63 परळी ग्रामीण 56