
शिवा संघटनेच्या भजनगायन स्पर्धेत शंभु महादेव भजनी मंडळ प्रथम महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त घेण्यात आल्या भजनी मंडळाच्या गायन स्पर्धा परळी (प्रतिनिधी) महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने दि.४ मे रोजी भजनी मंडळ गायन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक परळीच्या शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळाने पटकावले.विजेत्या महिला भजनी मंडळांना समाजबांधवांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने दरवर्षी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त विविध समजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी जयंती दिनी महात्मा बसवेश्वर प्रतिमा पूजन,महात्मा बसवेश्वर चौक सुशोभीकरण हे कार्यक्रम घेतल्यानंतर रविवार दि.४ मे रोजी संत गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे भजनी मंडळ स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये प्रथम पारितोषिक शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळ,द्वितीय पारितोषिक वैजनाथ भजनी मंडळ तर तृतीय पारितोषिक हरिहर भजनी मंडळाने मिळवले. विजेत्यांना रोख रक्कम,स्मृती चिन...