पोस्ट्स

इमेज
  शिवा संघटनेच्या भजनगायन स्पर्धेत शंभु महादेव भजनी मंडळ प्रथम महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त घेण्यात आल्या भजनी मंडळाच्या गायन स्पर्धा परळी (प्रतिनिधी)   महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने दि.४ मे रोजी भजनी मंडळ गायन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत प्रथम पारितोषिक परळीच्या शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळाने पटकावले.विजेत्या महिला भजनी मंडळांना समाजबांधवांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.   शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने दरवर्षी क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त विविध समजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी जयंती दिनी महात्मा बसवेश्वर प्रतिमा पूजन,महात्मा बसवेश्वर चौक सुशोभीकरण हे कार्यक्रम घेतल्यानंतर रविवार दि.४ मे रोजी संत गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे भजनी मंडळ स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये प्रथम पारितोषिक शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळ,द्वितीय पारितोषिक वैजनाथ भजनी मंडळ तर तृतीय पारितोषिक हरिहर भजनी मंडळाने मिळवले. विजेत्यांना रोख रक्कम,स्मृती चिन...

निकालापुर्वी वैभवी भावुक: काय बोलली?

इमेज
स्व.संतोष देशमुखांची लेक वैभवी झाली १२ वी उत्तीर्ण: मिळवली चांगली टक्केवारी !      मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने महाराष्ट्रभर आंदोलन केले. नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वैभवीचे हे बारावीचे वर्ष होते. त्यामुळे डिसेंबरपासून वडिलांना न्याय मिळावा यासाठी फिरणाऱ्या वैभवची परीक्षेत कामगिरी कशी असणार याची उत्सुकता होती. वैभवीने आपल्या गुणांनी सगळ्यांना चकीत केले. बारावीमध्ये  तब्बल तिला 85.33 टक्के गुण मिळवले आहेत.बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत. निकालापुर्वी वैभवी भावुक: काय बोलली? महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजेनंतर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता ...

लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण केल्याने पाठ झाली काळी निळी

इमेज
  गुत्तेदार आणि त्यांच्या गुंडा कडून ट्रॅक्टर चालक मजुराला बेदम मारहाण ! लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण केल्याने पाठ झाली काळी निळी  केज :- केज येथे एका वीज वितरण कंपनीचे कामे करीत असलेल्या एका गुत्तेदाराने आणि त्याच्या गुंडाने त्यांच्याकडे काम करीत असलेल्या एका ट्रॅक्टर चालक मजुराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीचे ईसमाची पाठ काळी-निळी झाली आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सावळेश्वर येथील गोविंद दौंड हा केज येथील वीज वितरण कंपनीचे गुत्तेदार यांच्याकडे खांब उभे करण्याच्या ट्रॅक्टरवर काम करीत आहे. दि.३ मे रोजी गुत्तेदाराने त्याला शिवीगाळ केल्याने तो त्याला शिव्या का देता ? असे म्हणाला आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग मनात ठेवून धारूर रोड केज येथे गोविंद दौंड हा आला असता सदर गुत्तेदार आणि त्याचे पाच ते सहा गावगुंड यांनी गोविंद दौंड याला एकट्याला गाठून संगनमत करून लोखंडी रॉड आणि काठ्या व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान या बेदम मारहाण प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून लव...

काही महिन्यांपूर्वीच आले होते वैद्यनाथ दर्शनाला परळीत......!

इमेज
योगगुरु पद्मश्री बाबा शिवानंद स्वामी यांचे निधन, वयाच्या १२८ व्या वर्षी अखेरचा श्वास वाराणसीमध्ये 128 वर्षांचे योगगुरू बाबा शिवानंद यांचे निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बाबा शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.योग साधक शिवानंद बाबा यांचे निधन झाले आहे. ●  सविस्तर वाचा: ● कोण आहेत स्वामी शिवानंद?  बाबा शिवानंद वाराणसीच्या भेलूपुरमधील दुर्गाकुंड भागात कबीर नगरमध्ये राहत होते. तिथेच त्यांचा आश्रम आहे. वाराणसीच्या हरिश्चंद्र घाटावर त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाराणसीमध्ये १२८ व्या वर्षी योग गुरु बाबा शिवानंद यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबा शिवानंद यांनी आपले संपूर्ण जीवन योग साधनेत समर्पित केले. त्यांनी अत्यंत साधे आयुष्य जगले आणि आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळला.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून शिवानंद बाबा यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले. २१ मार्च २०२२ रोजी त्यांना पद्मश्री पुरस्...
इमेज
अखेर बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख आली; बोर्डाची अधिकृत माहिती; विद्यार्थ्यांसाठी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इ. १२ वी परीक्षेचा निकाल ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर पाहता येतील. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे. तसेच, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत संधी उपलब्ध आहेत. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इ. १२ वीच्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (website) निकाल पाहू शकतील. तसेच, Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका (marksheet) उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इ. १२ वी...

दारुची नशा करी जिवनाची दुर्दशा

इमेज
  दारुच्या नशेत बापाने मुलांच्या डोक्यात लाकडी दांडा मारुन केला खून माजलगाव शहराजवळील खानपुर येथील घटना  --------------------------------------------- माजलगाव दि.४(प्रतिनिधी)माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबुचा पाय घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.    रोहीत गोपाळ कांबळे असे मयत तरूणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत मुलगा आणि आरोपी असलेला बाप या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच कुरबुरी व्हायच्या. आठ दिवसांपुर्वीच रोहीत कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कुरबूर झाली. यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस पोउपनि आकाश माकणे व इतर इतर पोलीस  कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी घटनास्थ पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्...
इमेज
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने भजनी मंडळ स्पर्धा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 894 व्या जयंती निमित्तशिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने भजनी मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.      शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना परळी वैद्यनाथ च्या वतीने रविवार दि 04:05:2025 रोजी सकाळी 09:00 वाजता क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 894 व्या जयंती निमित्त भजनी मंडळ स्पर्धा 2025 चे आयोजन श्री संत गुरुलिंगस्वामी मठ संस्थान, बेलवाडी या ठिकाणी केले असुन स्पर्धेतील प्रथम,द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात येणार आहेत तरी या कार्यक्रमास जास्ती जास्त भजनी मंडळाने सहभाग नोंदवावा व कार्यक्रमासाठी समाज बांधवानी  तसेच भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  आयोजक शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना,परळी वैजनाथ यांनी केले आहे.