पोस्ट्स

इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...
इमेज
आ.रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनात महादेव गंगणे पाटील यांनी नोंदवला सहभाग परळी | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी भेट देत सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. आंदोलनादरम्यान शेतकरी कर्जमाफीची मर्यादा वाढविणे, ओटीएस योजनेतील अटी शिथिल करणे, वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देणे, पीकविमा योजनेतील जाचक अटी रद्द करणे तसेच पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासंदर्भातील मागण्या उपस्थित करण्यात आल्या. शेतकरी अडचणीत असताना शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने तत्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्...
इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्ती निमित्त ना. पंकजा मुंडे यांनी सोमठाण्यात केली महाआरती रेणुकामाता मंदिराला तीर्थक्षेत्राचा 'ब' दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील ; मंदिर परिसरात केले वृक्षारोपण जालना दि. १४ --- सोमठाणा (ता. बदनापूर) येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता मंदिराला तीर्थक्षेत्राचा 'ब' दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला बारा  वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या हस्ते आज महाआरती आणि मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.    ना. पंकजाताई मुंडे आज जालना दौऱ्यावर आल्या होत्या.छत्रपती संभाजीनगर येथून जालन्याकडे जाताना रस्त्यात बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता मंदिरात त्यांनी महाआरती केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विकासाचे एक तप पूर्ण केले आहे, तळागाळातील सर्व सामान्य माणसाच्या विकासाचा संकल्प पूर्ण करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले. र...
इमेज
  परळीतील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची भक्तिमय वातावरणात मंगलमय सांगता ! समाजात प्रेम, सद्भावना आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी भागवतकथा  दिशादर्शक- भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळूमहाराज उखळीकर परळी वैजनाथ | प्रतिनिधी पुरुषोत्तम मासाच्या पावन पर्वानिमित्त दगडगुंडे– पाटील– सेवलीकर परिवाराच्या वतीने गणेशपार येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मनोहरपंत बडवे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची भक्तिमय वातावरणात मंगलमय सांगता झाली. या सोहळ्याने भाविकांना भक्ती, ज्ञान, संस्कार आणि अध्यात्माचा अमूल्य ठेवा प्रदान केला.समाजात प्रेम, सद्भावना आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी भागवतकथा  दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळूमहाराज उखळीकर यांनी केले.    पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त परळी वैजनाथच्या पवित्र भूमीत दगडगुंडे, पाटील व सेवलीकर परिवाराच्या वतीने सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या ज्ञानयज्ञाची आज (दि.१४ ) रोजी अतिशय मंगलमय वातावरणात सांगता झाली. गेल...

अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण

इमेज
परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगावचा विजय बनला एमबीबीएस 'डॉक्टर'; गावकऱ्यांकडून भव्य मिरवणूक अन् नागरी सत्कार! ​अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण ​ एसटी चालकाच्या मुलाची गगनभरारी; परिसरातून कौतुकाचा वर्षाव ​परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीवर मात करत गाढे पिंपळगाव येथील विजय अरुण गिरी यांनी एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या दैदिप्यमान यशाबद्दल गाढे पिंपळगावच्या वतीने डॉ. विजय गिरी यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, तसेच ग्रामदैवत श्री पापदंडेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांचा आई-वडिलांसह नागरी सत्कार करण्यात आला.     ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी तथा राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चालक अरुण गिरी यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. मात्र, आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी मुलगा विजयला शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहित केले व पोट...

ऐसा आनंद सोहळा, जगमित्र नागा पाहे डोळा”

इमेज
संत जगमित्रनागा अभंग गाथेच्या प्रकाशनानंतर संत जगमित्रनागांची जन्मभूमी पिरंगुटमध्ये स्वागत व सत्कार पिरंगुट, प्रतिनिधी : ऐतिहासिक संतभूमी पिरंगुट येथील १३व्या शतकातील संतश्रेष्ठ जगमित्र नागा महाराज यांच्या दुर्मिळ अभंगांचा अमूल्य ठेवा असलेल्या ‘संत जगमित्रनागा अभंग गाथा’ या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने संपादक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांचा स्वागत व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक तथा ‘संत जगमित्र नागा चरित्र’ ग्रंथाचे लेखक ह.भ.प. ॲड. दत्तात्रय आंधळे यांनी संपादित केलेल्या या गाथेमध्ये संत जगमित्रनागा महाराजांचे दुर्मिळ अभंग संकलित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अभंगांसोबत त्यांचा सोपा व सुबोध भावार्थही देण्यात आल्याने हा ग्रंथ वारकरी संप्रदायातील अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार, संशोधक आणि संत साहित्यप्रेमींसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आर. आर. सूर्यवंशी, एस. आर. सूर्यवंशी, मठाधिपती श्री गिरी महाराज, मुळशी पंचायत समिती सदस्य राहुल पवळे, पोलीस पाटील प्रकाश पवळे, माजी सरपंच चांगद...
इमेज
गावच्या राजकारणावरून दोघांनी स्मशानभूमीतच केली हाणामारी केज: गावच्या राजकारणावरून झालेल्या वादातून स्मशानभूमीतच दोन व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे घडली आहे. १० जून रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली माळी येथील रहिवासी हेमंत श्रीपती घोडके हे गावाशेजारील स्मशानभूमीजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाच्या सावलीत बसले होते. त्याच वेळी गावातील तुकाराम दादाराव गालफाडे तेथे आले. दोघांमध्ये गावच्या राजकारणावर चर्चा सुरू असताना अचानक वाद उफाळून आला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले. हेमंत यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केला असता, संतप्त झालेल्या तुकाराम यांनी त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता तुकाराम यांनी लाकडाने हेमंत यांच्या हातावर आणि पायावर बेदम प्रहार केले. या मारहाणीत हेमंत जखमी झाले.      या घटनेमुळे शांत असलेल्या ग्रामीण भागात राजकारणाचा विळखा किती घट्ट आणि उग्र झाला आहे, याचे विदारक चित्र समोर आले आहे. हेमंत घोडके यांनी ...