सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर...
स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्था: 134 कोटी 57 लाखांचीआर्थिक उलाढाल तर 54 लाख 76 हजार निव्वळ नफा ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासावर प्रगतीची वाटचाल -बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि. शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख समृद्ध करत स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात मार्च 2026 अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. 134 कोटी 57 लाखांचीआर्थिक उलाढाल तर 54 लाख 76 हजार निव्वळ नफा असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी सरत्या आर्थिक वर्षातील मार्च 2026 अखेर चा ताळेबंद सादर करण्यात आला. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2026 अखेर संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आ...