गावभागातील वारंवार वीज खंडित होण्याने नागरिक त्रस्त; कन्याशाळा फीडरची तातडीने तांत्रिक तपासणी करा तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलन- अनंत इंगळे परळी वैजनाथ : प्रतिनिधी परळी वैजनाथ शहरातील गावभाग परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लघु व्यावसायिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस अनंत इंगळे यांनी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कन्याशाळा फीडरअंतर्गत येणाऱ्या मिलिंदनगर, मोमीनपुरा, भीमनगर, बरकत नगर, फतेहनगर, शिवनगर, इंदिरानगर, संभाजीनगर, रेहमतनगर, पद्मावती, आनंदनगर, साठेनगर, उखळवेस, कृष्णानगर, मल्हारनगर, सिद्धेश्वरनगर, गंगासागरनगर, खुदबेनगर, इशानगर, इक्बालनगर आदी भागात दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, सध्या दुष्काळजन्य परिस्थितीत पाणीपु...