पोस्ट्स

२० ऑक्टोबरला पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार पारंपरिक सीमोल्लंघन

इमेज
भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला प्रशासकीय परवानगी बीड,प्रतिनिधी :            बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावारगाव येथील श्री संत भगवानबाबा स्मारक मंदिर परिसरातील भगवान भक्तीगडावर यंदा पारंपरिक दसरा सीमोल्लंघन व दसरा मेळावा २० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.            पाटोद्याचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी यासंदर्भातील मंजुरी पत्र दिले आहे. आयोजकांनी ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली आहे. भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यासाठी सुमारे ५.२७ हेक्टर क्षेत्रातील १० एकर १० गुंठे जागा उपलब्ध असुन याठिकाणी दसरा मेळावा होणार आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो.यंदाचा दसरा मेळावा २० ऑक्टोबर रोजी असणार आहे.या दसरा मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त - मुंडे समर्थक लाखो समर्थक भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात...

आपला दसरा... आपली परंपरा...

इमेज
  भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा : मी येतेय...तुम्ही सुखरूप या - पंकजाताईं मुंडेंचे आवाहन बीड | प्रतिनिधी....      राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सावरगावघाट येथील भगवान भक्तीगडावर  होणाऱ्या दसरा मेळाव्याची दरवर्षीच उत्सुकता असते. लाखोंची गर्दी हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य असते. या अनुषंगानेच आपली परंपरा- आपला दसरा साजरा करण्यासाठी मी येत आहे,आपणही या पण सुखरूप या व सुखरूप परत जा असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.          भगवान भक्तीगडावर  होणारा दसरा मेळावा वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून या दसरा मेळाव्याची ओळख आहे.राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो.यंदाचा दसरा मेळावा २० ऑक्टोबर रोजी असणार आहे.या दसरा मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त - मुंडे समर्थक लाखो समर्थक भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात.संत भगवान बाबाची जन्मभूमी असल्याने सावरगाव घा...

संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू..

इमेज
खळबळजनक : परळीत दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; पालकांमध्ये चिंतेचे वातावरण संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल; मुलींचा शोध सुरू परळी वैजनाथ, प्रतिनिधी :     परळी शहरातून गेल्या दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून मुलींचा शोध घेतला जात आहे.          पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी गुन्हा क्रमांक २४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत, गणेशपार भागातील गोंडेगल्ली परिसरातील एका १६ वर्षे ६ महिन्यांच्या मुलीला १३ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्य...
इमेज
  बाप-लेकीवर पेटता फटाका फेकला; दोघे भाजले मंजरथ रोडवरील घटना; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल माजलगाव : ट्युशनला जाणाऱ्या ग्रामसेवक आणि त्यांच्या दहा वर्षीय मुलीवर पेटता फटाका फेकल्याची घटना सोमवारी (दि. १२) संध्याकाळी माजलगावातील मंजरथ रोडवर घडली. या घटनेत दुचाकीवरील दिलीप खरात (वय ४२) आणि त्यांची मुलगी आर्या हे दोघेही भाजून जखमी झाले. याप्रकरणी मंगेश शिंदे या तरुणाविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप खरात हे मुलगी आर्यासह दुचाकीवरून ट्युशनला जात होते. त्यावेळी मंगेश शिंदे याने त्यांच्यावर पेटता फटाका (तोफ) फेकल्याचा आरोप आहे. हा फटाका दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर पडल्याने स्फोट झाला. यात खरात पिता-पुत्री भाजून जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. दिलीप खरात यांच्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हवालदार राहुल गुरखुडे पुढील तपास करीत आहेत.

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली...

इमेज
  शिवराज बर्दापुरे यांचे निधन; योगीराज बर्दापुरे यांना बंधुशोक परळी / प्रतिनिधी परळी येथील प्रणव लॅबचे संचालक योगीराज बर्दापुरे यांचे ज्येष्ठ बंधू शिवराज गंगाधरआप्पा बर्दापुरे (वय ६७) यांचे मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) अल्पशा आजाराने निधन झाले. लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शिवराज बर्दापुरे हे जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. तसेच वीरशैव लिंगायत समाजाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित होते. त्यांच्या निधनाने बर्दापुरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर बुधवारी(दि.१४) सकाळी ९.३० वाजता परळी येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी, दोन मुले, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवराज बर्दापुरे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  बर्दापुरे कुटूंबीयांच्या दुःखात दै.मराठवाडा साथी परिवार सहभागी आहे.

तेली समाज दांडिया महोत्सवाचे पाचवे पुष्प उत्साहात सुरू

इमेज
  पृथ्वीवर देवीचे रूप म्हणजे स्त्री होय! -नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांचे प्रतिपादन परळी वैजनाथ, दि. १३ (प्रतिनिधी)      “पृथ्वीवर देवीचे रूप म्हणजे स्त्री होय. स्त्रीमध्ये प्रेम, माया, करुणा आणि शक्ती यांचा सुंदर संगम असतो. त्यामुळे स्त्रीचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. तेली समाजाच्या वतीने आयोजित दांडिया महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.    परळी येथे गेल्या चार वर्षांपासून तेली समाजाच्या वतीने दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, यंदा या महोत्सवाचे पाचवे पुष्प मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहे. सोमवारी (दि. १२) आयोजित उद्घाटन समारंभाला नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, तेली समाजाचे अध्यक्ष विठ्ठल आप्पा चौधरी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, सचिव प्रा. मधुकर शिंदे आणि तालुकाध्यक्ष मनोज जठार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा...

नवरात्रोत्सवानिमित्त कलासेवेतून भक्तिभावाचे दर्शन

इमेज
डोंगरतुकाई देवी मंदिरात रांगोळीतून साकारले दुर्गामातेचे रूप! मैथिली लोंढे यांचे १२ तासांचे परिश्रम; नवरात्रोत्सवानिमित्त कलासेवेतून भक्तिभावाचे दर्शन परळी वैजनाथ : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त परळीतील श्री डोंगरतुकाई देवी मंदिरात रांगोळीतून दुर्गामातेचे मनमोहक रूप साकारण्यात आले आहे. कलावंत मैथिली लोंढे आणि त्यांच्या सहकारी आशा शिंदे यांनी तब्बल १२ तास परिश्रम घेत ही आकर्षक रांगोळी साकारली. त्यांच्या या कलाकृतीतून देवीभक्तीबरोबरच कलेप्रती असलेली निष्ठा आणि समर्पणाचे दर्शन घडत आहे. परळी शहरातील माणिकनगर भागातील मैथिली लोंढे या ‘कलामय आर्ट क्लासेस’च्या संस्थापिका आहेत. त्यांना लहानपणापासूनच कलेची आवड असून, पेंटिंग, रांगोळी आणि पेन्सिल स्केचिंग अशा विविध कलाप्रकारांत त्या सातत्याने काम करतात. मात्र, रांगोळी हा त्यांचा विशेष आवडीचा कलाप्रकार आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून त्या विविध मंदिरात सेवाभावाने रांगोळी साकारत आहेत..पूर्वी महाशिवरात्रीनिमित्त २०२३ मध्ये प्रभू वैद्यनाथ मंदिरात त्यांनी शंकर-पार्वतीची भव्य रांगोळी साकारली होती. तसेच  श्री संत जगमित्र नागा मंदिरात गजानन महाराजांच्या...