पोस्ट्स

भावपूर्ण श्रद्धांजली.....

इमेज
मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व हरपले; सौ. माधुरी इटके यांचे निधन महादेव दत्तात्रयअप्पा इटके यांना पत्नीशोक परळी वैजनाथ / प्रतिनिधी भाजपचे परळी शहर उपाध्यक्ष तथा वीरशैव सभा परळी तालुका अध्यक्ष महादेव दत्तात्रयअप्पा इटके यांच्या पत्नी आणि वैद्यनाथ विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षिका सौ. माधुरी महादेवअप्पा इटके यांचे आज 15 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजता पुणे येथे उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने इटके परिवारासह वीरशैव लिंगायत समाजात हळहळ व्यक्त होत आहे. सौ. माधुरी वहिनी या मनमिळाऊ, सुस्वभावी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित होत्या. इटके परिवारातील ज्येष्ठ सून म्हणून त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या अत्यंत आपुलकीने पार पाडल्या. घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक पाहुणचार करणे, सर्वांशी प्रेमाने संवाद साधणे आणि नात्यांमधील जिव्हाळा जपणे, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. वीरशैव लिंगायत समाजातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यांतही त्...

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

इमेज
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाच्या कुटुंबाला एसबीआय चा एक कोटींचा आधार अपघाती मृत्यूनंतर दिवंगत सौदागर सावंत यांच्या वारसांना विमा मदत; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते धनादेश सुपूर्द परळी, प्रतिनिधी : कर्तव्यावर असताना नव्हे, तर अपघाती मृत्यूने अकाली काळाच्या पडद्याआड गेलेल्या पोलीस अंमलदाराच्या कुटुंबाला भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) सॅलरी पॅकेजअंतर्गत एक कोटी रुपयांची विमा मदत मिळाली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दिवंगत सौदागर माणिकराव सावंत यांच्या वारस सुनंदा सावंत यांना १४ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सौदागर सावंत यांचा १६ जानेवारी २०२६ रोजी बीड शहरातील स्वराज्यनगर परिसरात सरस्वती शाळेजवळ स्कूटीचा ब्रेकरवर आदळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार हरपल्याने निर्माण झालेल्या आर्थिक संकटात बँकेच्या विमा संरक्षणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सॅलरी पॅकेजमुळे विमा संरक्षणाचा लाभ पोलीस कर्मचाऱ्यांच्या सॅलरी पॅकेज खात्याशी संलग्न विमा संरक्षणातून ही रक्कम मंजूर झाली. विमा मदतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी S...

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय जारी

इमेज
अंगणवाडी सेविका-मदतनीसांना भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये देण्यास शासनाची मंजुरी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय जारी मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये देण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत महिला व बालविकास विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना भाऊबीज भेट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. या रकमेच्या वितरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. तसेच पात्र सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेटीची रक्कम तातडीने अदा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आर्थिक दिलासा मिळणार ...

परळीकरांमुळेच ही संधी; संधीचे सोने करून परळीचा नावलौकिक करू - नगराध्यक्षा

इमेज
  ● अभिमानास्पद : परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा! परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची ऑल -एलएसजी च्या राज्य गव्हर्निंग मेंबरपदी निवड ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ- गव्हर्नमेंटच्या नियामक मंडळावर निवड होणाऱ्या परळीतील ठरल्या पहिल्याच नगराध्यक्ष परळी वैजनाथ : प्रतिनिधी परळी वैजनाथच्या लोकनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात सर्वात जुन्या व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या १०० वर्षांपासून कार्यरत असलेल्या शासनमान्य प्रतिष्ठित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंटच्या (ऑल -एलएसजी) महाराष्ट्र राज्य गव्हर्निंग मेंबरपदी बिनविरोध निवड झाली आहे. परळीकरांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असुन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंटच्या नियामक मंडळावर निवड होणाऱ्या सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी या परळीतील पहिल्याच नगराध्यक्ष ठरल्या आहेत. त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.        पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजाताई मुंडे व राज्याचे माजी ...

दोघांना अटक, ७१,४००/- रोकड हस्तगत

इमेज
परळी वैजनाथ : रेडीमेड कपड्यांच्या दुकानातील चोरीत आंतरराज्य टोळी! दोघांना अटक, ७१,४००/- रोकड हस्तगत परळी वैजनाथ, प्रतिनिधी.,..       परळी वैजनाथ येथील गांधी मार्केट परिसरातील रेडीमेड कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून रोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने  पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या टोळीतील दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ७१,४०० रुपयांची रोकड जप्त केली आहे.         दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २:०० ते २:३० वाजण्याच्या सुमारास, परळी वैजनाथ येथील गांधी मार्केटमधील 'अजय कलेक्शन' या रेडीमेड कपड्यांच्या दुकानाचे शटर उचकटून अंदाजे १,५०,०००/- रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. दिनांक १४.१०.२०२६ रोजी पाटोदा येथून दोन आरोपींना...

परळीतील २२ वर्षीय युवतीच्या निधनानंतर कुटुंबाचा संवेदनशील निर्णय....दोन व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा उजळला प्रकाश...

इमेज
  जागतिक अंध दिन विशेष | काळोखातून प्रकाशाकडे नेणारे परळीतील कुटुंबाचे दातृत्व!  दोन व्यक्तींच्या आयुष्यात पुन्हा उजळला प्रकाश अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’मध्ये पहिले ऐतिहासिक नेत्रदान  २२ वर्षीय युवतीच्या निधनानंतर कुटुंबाचा संवेदनशील निर्णय; नेत्रपेढीला मिळाली नवी दिशा अंबाजोगाई/परळी.... (प्रतिनिधी)... एका बाजूला तरुण मुलगी गमावल्याचे असह्य दुःख... तर दुसऱ्या बाजूला तिच्या जाण्यानंतरही तिच्या अस्तित्वाचा प्रकाश इतरांच्या आयुष्यात जिवंत ठेवण्याची उदात्त भावना! परळीतील एका २२ वर्षीय युवतीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबाने घेतलेल्या नेत्रदानाच्या निर्णयाने दुःखाचे रूपांतर दोन व्यक्तींच्या आयुष्यात नव्या आशेत केले. या दातृत्वामुळे लातूर येथील दोन व्यक्तींना पुन्हा दृष्टी मिळाली असून, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (स्वाराती) इतिहासातही नेत्रदानाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. जागतिक अंध दिनाच्या निमित्ताने ही घटना केवळ एका नेत्रदानाची नोंद ठरत नाही, तर मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश पेरता येतो, हा मानवी संवेदनांचा प्...

२० ऑक्टोबरला पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार पारंपरिक सीमोल्लंघन

इमेज
भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याला प्रशासकीय परवानगी बीड,प्रतिनिधी :            बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावारगाव येथील श्री संत भगवानबाबा स्मारक मंदिर परिसरातील भगवान भक्तीगडावर यंदा पारंपरिक दसरा सीमोल्लंघन व दसरा मेळावा २० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.            पाटोद्याचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी यासंदर्भातील मंजुरी पत्र दिले आहे. आयोजकांनी ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने ही परवानगी देण्यात आली आहे. भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यासाठी सुमारे ५.२७ हेक्टर क्षेत्रातील १० एकर १० गुंठे जागा उपलब्ध असुन याठिकाणी दसरा मेळावा होणार आहे. राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो.यंदाचा दसरा मेळावा २० ऑक्टोबर रोजी असणार आहे.या दसरा मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त - मुंडे समर्थक लाखो समर्थक भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात...