पोस्ट्स

MB NEWS-*परळी : खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे हस्ते 200 विधवा महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप* *रोजगाराची संधी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान!* परळी (दि. 11) ---- : परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील 200 विधवा महिलांना खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात या महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती व आज खा. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या 200 महिलांना ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व हस्ते तसेच नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. *राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थीना धनादेश वितरित* याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण देखील ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी परळी मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीताताई तुपसागर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ चाचा पौळ, नगरसेवक दिपक नाना देशमुख, वैजनाथ सोळंके, सुरेश टाक, गोविंद कराड, सय्यद सिराज, अनंत इंगळे, चित्रा देशपांडे, अर्चना रोडे, श्रीकृष्ण कराड, नाझेर हुसैन, अनिल आष्टेकर, अझिज कच्छी, जयराज देशमुख, अय्युब पठाण, जाबेर खान पठाण, गोविंद कुकर, राजेंद्र सोनी, केशव गायकवाड, जयप्रकाश लड्डा, किशोर पारधे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांसह आदी उपस्थित होते.

इमेज
 * परळी : खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे हस्ते 200 विधवा महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप* *रोजगाराची संधी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान!* परळी (दि. 11) ---- : परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील 200 विधवा महिलांना खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात या महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती व आज खा. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या 200 महिलांना ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व हस्ते तसेच नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. *राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थीना धनादेश वितरित* याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थींना प्रत्येकी 20 हज...

MB NEWS-पत्रकार अनंत गित्ते यांचे निधन

इमेज
  पत्रकार अनंत गित्ते यांचे निधन  परळी (प्रतिनिधी): पत्रकार अनंत सुमंतराव गित्ते रा. पांगरी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. मृत्युसमयी ते सुमारे ४७ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दि.११रोजी दुपारी २:३० वा.अंत्यसंस्कार करण्याता येणार आहेत.          मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराति रुग्णालयात उपचार चालू होते त्यातच त्यांची आज प्राणज्योत मालवली.विविध वृत्तपत्रांसाठी अनंत गित्ते शेती व शेतकऱ्यांच्या समस्या यांवर सातत्याने लिखान करीत होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचाराला प्रतिसाद मिळत असतांनाच आज त्यांना मृत्यू आला.अनंत गित्ते रा. पांगरी हे दै. लोकमंथन व अन्य दैनिकांसाठी प्रतिनिधी म्हणून काम करीत हाेते. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. गित्ते कुटूंबीयांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार प्रा. मधु जामकर यांना जाहीर;परळीत ह्रदय सत्कार

इमेज
  महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार   प्रा. मधु जामकर यांना जाहीर;परळीत ह्रदय सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी)÷ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रकाशित उत्कृष्ट लेखांसाठी देण्यात येणारा २०२० सालचा श्रीमती ताईसाहेब कदम पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक प्रा. मधु जामकर यांना जाहीर झालाबद्दल शहरातील भाजपा जेष्ठ नेते दत्ताप्पा ईटके,वैद्यनाथ अर्बन बॕंकचे जेष्ठ संचालक विकासराव डुबे यांनी शाल, श्रीफळ,हार घालून सत्कार केला. परळी येथून मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेले प्रा. जामकर यांचा प्रख्यात साहित्यिक पंडित महादेवशास्त्री जाेशी यांच्या तीर्थरुप महाराष्ट्र खंड १,२ व ३ यावर साहित्य पत्रिकेत विस्तृत लेख प्रकाशित झाला हाेता. या लेखाची उत्कृष्ट लेख म्हणून पुणे साहित्य परिषदेने निवड केली.  यावेळी माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, प्रकाश जोशी, दत्ताभाउ कुलकर्णी, वासुदेव पाठक यावेळी उपस्थित होते.

MB NEWS-राशिभविष्य (दि. ११ डिसेंबर २०२१)

इमेज
  राशिभविष्य (दि. ११ डिसेंबर २०२१) मेष-नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. वृषभ-मनासारख्या गोष्टी होतील. प्रयत्नांना यश मिळेल. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मिथुन-रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. नियोजित कामांमध्ये अडचणी येतील. कर्क-अपयशाने खचू नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. वाद-विवादापासून दूर राहा. सिंह-इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. कन्या- आरोग्य उत्तम राहील. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग संभवतात. संधीचे सोने कराल. तूळ-निर्णय घेताना सावधानता बाळगा. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे. वृश्चिक-अनावश्यक भीती बाळगू...

MB NEWS- MB NEWS ला नक्की Subscribe करा.⬛ *दिवसभराच्या घडामोडींचा आढावा.*⬛ *दर्जेदार आणि सकस आशयाची बातमी*⬛ _क्षणाक्षणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालीललिंक वर क्लिक करा._👇👇

इमेज
  MB NEWS ला नक्की Subscribe करा. ⬛ *दिवसभराच्या घडामोडींचा आढावा.* ⬛ *दर्जेदार आणि सकस आशयाची बातमी* ⬛  _क्षणाक्षणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी खालीललिंक वर क्लिक करा._👇👇👇👇 🕳️ *MB NEWS च्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका.* _नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन➡️🔔 नक्की क्लिक करा._ https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg

MB NEWS-हेळंब येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले दर्शन

इमेज
  हेळंब येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी घेतले दर्शन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       परळी तालुक्यातील हेळंब येथील खंडोबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त आज बीडच्या खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी खंडोबाचे दर्शन घेतले.       मौजे हेळंब येथील ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रेस गुरुवारी प्रारंभ झालाआहे. यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलेआहे. हेळंब येथे 09 ते 11 डिसेंबर दरम्यान ग्रामदैवत श्री.खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. आज याठिकाणी बीडच्या खा.डाॅ. प्रितम मुंडे यांनी खंडोबाचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

MB NEWS-लोकनेत्याच्या जयंतीदिनी वैद्यनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाला ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार शुभारंभ !

इमेज
  लोकनेत्याच्या जयंतीदिनी वैद्यनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाला ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार शुभारंभ ! परळी वैजनाथ  ...         वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ व्या  गळीत हंगामाचा शुभारंभ लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी रविवारी (दि.१२ डिसेंबर) कारखान्याच्या अध्यक्षा  पंकजा मुंडे यांच्या हस्ते  होणार आहे.         वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गाळपास सज्ज झाला आहे. कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप  करण्याची व्यवस्था करण्यात आली असून तशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार  दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता कारखान्याच्या चेअरमन पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मुकादम, मजुर व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याच्या  वतीने करण्यात आले आहे.