पोस्ट्स

MB NEWS-डॉ.संतोष मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार अन् सदीच्छांचा अक्षरशः वर्षाव

इमेज
  डॉ.संतोष मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार अन् सदीच्छांचा अक्षरशः वर्षाव ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      डॉ.संतोष मुंडे म्हणजे सर्व स्तरात लोकप्रिय ठरलेले सुसंस्कृत युवा नेतृत्व आहे.दिव्यांगासाठी वाहून घेतलेले डॉ.संतोष मुंडे सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वेळी सदैव मदतीला तत्पर असतात. त्यामुळे त्यांचे संघटन, जनसंपर्क अफाट झालेला आहे.याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी च येतो.  सर्व स्तरातून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी स्नेहीजणांनी दिवसभर रिघ लावली होती. आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी एक ऋण आहे.ऋणानुबंधाचे नाते कायम ठेवा.सदैव ऋणात राहील अशा शब्दांत डॉ.संतोष मुंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

MB NEWS-*डॉ. दंडे यांच्या जाण्याने परळीच्या वैद्यकीय सेवा व सामाजिक चळवळीतील एका निरपेक्ष सेवा पर्वाचा अस्त - धनंजय मुंडे*

इमेज
 *डॉ. दंडे यांच्या जाण्याने परळीच्या वैद्यकीय सेवा व सामाजिक चळवळीतील एका निरपेक्ष सेवा पर्वाचा अस्त - धनंजय मुंडे* *परळीतील ज्येष्ठ डॉ. दिगंबर दंडे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला शोक व्यक्त* परळी (दि. 08) - : परळी तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात गेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक कालावधी निरपेक्षपणे रुग्णांची यशस्वी सेवा करणारे तसेच परळीच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व ज्येष्ठ डॉ. दिगंबर दंडे यांच्या निधनाने परळीच्या वैद्यकीय सेवा व सामाजिक चळवळीतील एका यशस्वी व प्रदीर्घ पर्वाचा अस्त झाल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. दीनदयाळ बँकेचे संस्थापक संचालक, डॉ. दिगंबर दंडे यांचे आज दुःखद निधन झाले, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.  डॉ. दंडे यांनी स्व. प्रमोदजी महाजन, स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास देखील भोगलेला आहे. आम्हाला राजकीय जडणघडणीत अनेकवेळा डॉ. दंडे यांचा सहवास लाभला आहे, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्ह...

MB NEWS-*डाॅ. दंडे यांच्या निधनाने परिवारातील सदस्याला मुकलो* *ना. पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली*

इमेज
 *डाॅ. दंडे यांच्या निधनाने परिवारातील सदस्याला मुकलो*  *ना. पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली*  परळी दि. ०८ ------  जुन्या पिढीतील नामवंत डाॅक्टर आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर अतोनात प्रेम करणारे   डाॅ. दि. ज. दंडे यांच्या निधनाने परिवारातील सदस्याला मुकलो आहोत, त्यांची उणीव आम्हाला नेहमी जाणवत राहील अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.     डाॅ. दंडे  हे लोकनेते मुंडे साहेबांचे मित्र तर होतेच शिवाय आमच्या परिवारातीलच एक होते. परळीतील जुन्या पिढीतील प्रसिध्द डाॅक्टर असलेल्या डाॅ. दंडे यांनी अनेक गोरगरीब रूग्णांना बरे केले.  सर्व सामान्य व तळागाळातील लोकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. भारतीय जनता पार्टीचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दीनदयाळ बॅकेचे ते बराच काळ चेअरमन होते,  बॅकेला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.  त्यांच्या निधनाने आम्ही परिवारातील सदस्याला मुकलो आहोत. कोरोनामुळे घरातील सर्व जण विलगीकरण...

MB NEWS-*परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील "पितामह" काळाच्या पडद्याआड; जुन्या पिढीतील प्रतिथयश डॉ. दि.ज.दंडे यांचे निधन*

इमेज
style="font-size: x-large;"> *परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील "पितामह" काळाच्या पडद्याआड; जुन्या पिढीतील प्रतिथयश डॉ. दि.ज.दंडे यांचे निधन*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....             परळी शहर , तालुक्यासह मराठवाड्यात सर्वदूर सर्वपरिचित व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर दिगंबर जनार्धन दंडे यांचे आज दि.८ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परळी शहराच्या वैद्यकीय क्षेत्रातील "पितामह" काळाच्या पडद्याआड गेल्याची शोक संवेदना व्यक्त होत आहे. शहरातील जुन्या पिढीतील प्रथितयश व रुग्णप्रिय डॉक्टर म्हणून डाॅ.दि.ज.दंडे यांची ओळख होती.त्यांच्या निधनामुळे परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील जुन्या पिढीतील अनुभवी व्यक्तीमत्व हरवले आहे.             डॉ. दिगंबर जनार्दन दंडे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते 85 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात डॉ. विवेक दंडे व अॅड.तेजस दंडे ही दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज दि.८ जानेवारी 2022 रोज...

MB NEWS- *सौंदणा येथे लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*

इमेज
style="font-size: x-large;">  *सौंदणा येथे लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त; परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल* परळी (प्रतिनिधी)       सर्वत्र गुटखा विक्री राजरोसपणे सुरु असुन जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलीसांचे धाडसत्र सुरू आहे. या अनुषंगाने सौंदणा ता.अंबाजोगाई येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये साठा करून ठेवलेला लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात नेमणूकी वरील पोलिस हवालदार बालाजी शेषराव दराडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार आरोपी गोविंद संदिपान उद्रे (वय २३) रा.सौंदणा याच्या राहत्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये विविध प्रकारचा गुटखा साठा करून ठेवलेला आढळून आला.राज्यात गुटखा बंदी असतानाही बेकायदेशीररित्या साठा जवळ बाळगुन चोरटी विक्री करण्यासाठी ३ लाख २९ हजार ६२० किंमतीचा गुटखा माल आढळून आला. अधिक चौकशी केली असता हा माल बसवकल्याण (कर्नाटक) येथुन आणल्याची माहिती आरोपीकडून मिळाली.या प्रकरणी आरोपी गोविंद संदिप...

MB NEWS-🔸वाचन संस्कृतीच माणूसपण टिकून ठेवेल-ज्येष्ठ सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा ठाम विश्वास ⭕शामसुंदर महाराज सोन्नर, देवेंद्र कोल्हटकर, मुकेश माचकर आदींचा सन्मान

इमेज
🔸वाचन संस्कृतीच माणूसपण टिकून ठेवेल-ज्येष्ठ सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा ठाम विश्वास ⭕शामसुंदर महाराज सोन्नर, देवेंद्र कोल्हटकर,  मुकेश माचकर आदींचा सन्मान  मुंबई (प्रतिनिधी) : सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वाचन संस्कृतीवर परिणाम झाल्यामुळे वृत्तपत्रे आणि पुस्तके यांच्या भवितव्याविषयी चर्चा केली जात आहे. मात्र वृत्तपत्रे आणि पुस्तके यावरच माणसाची संस्कृती अवलंबून आहे. ही वाचन संस्कृतीच माणूसपण जीवंत ठेवील,  असे ठाम मत व्यक्त करून वाचणारी माणसे असेपर्यंत पुढील हजारो वर्ष वृत्तपत्रे आणि पुस्तके टिकून राहतील, असा ठाम विश्वास महनीय प्रवक्ते, राज्य शासनाच्या जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेचे सचिव आणि ज्येष्ठ गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिनानिमित्त ते बोलत होते. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवारी पत्रकार भवनात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना पांढरपट्टे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे होते. या समारंभास ...

MB NEWS-अविनाश मुडेगांवकर यांना मराठवाडा स्तरीय शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर*

इमेज
 * अविनाश मुडेगांवकर यांना मराठवाडास्तरीय शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर* अंबाजोगाई-:उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा मराठवाडा स्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार अंबाजोगाई येथील लोकमत चे तालुका प्रतिनिधी अविनाश मुडेगांवकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.               उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गेल्या  बारा वर्षापासुन मराठवाडास्तरिय उत्कृष्ठ वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जात असुन पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात  शोध वार्ता गटात  प्रथम पुरस्कार दैनिक लोकमतचे अंबाजोगाई  येथील प्रतिनिधी अविनाश मुडेगावकर यांच्या 'जिवावर उदार होऊन ४००रु रोजाने करतात काम ' या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रु रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ...