MB NEWS-महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी उमेदवारांना ३१ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम, भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाल संपत आहे. तसेच जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असल्याने त्यापूर्वी राज्य सभा निवडणूक होणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या ६ जागंवर या खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार की याठीकाणी नवीन चेहरे दिसणार याची जनतेत उत्सुकता आहे. हे देखील वाचा/पहा🔸 *खासदार संभाजीराजे छत्रपतींची "स्वराज्य" भूमिका !* 🌑 *आ.अमोल मिटकरींना "ते" वक्तव्य भोवणार!* 🌑 *दुर्दैवाने गाठलं* 🌑 _*साठ फूट खोल दरीत कोसळली कार एकाच कुटुंबातील चौघे ठार*_ 🛑 *परळीत माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव ; लक्षवेधी शोभ...