पोस्ट्स

इमेज
  परळीत विजेचा अखंडित खोळंबा: खासदारांच्या कार्यक्रमातही वीज गुल; नागरिकांतील संतापाच्या भावनांची दखल घ्या - ॲड. जीवन देशमुख  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)      परळीतील महावितरणाचा ठरलेला  नेहमीचा सिरस्ता सुरुच आहे. शहरात रात्रंदिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे खासदार स्वतः परळीत असतांना भर कार्यक्रमात ही वीज खंडित झाली. एवढा गलथानपणा सुरु असुन याची संबंधितांनी दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख यांनी दिला आहे.     वीजवितरण कंपनीने मात्र नेहमीप्रमाणेच  आपला गलथान कारभार  सुरूच ठेवलेला आहे.भर उन्हाळा सुरु झाला तसा विजेचा लपंडावही सुरू झाला आहे. असंख्य वेळा नागरिकांनी आमच्या भागातील वीजपुरवठा  सुरळीत चालू ठेवावा, विविध ठिकाणी असलेल्या त्रुटी दूर कराव्यात, वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी वारंवार मागणी केली पण याची दखल वीजवितरण कंपनीने घेतलेली नाही.याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वीजवितरण कंपन...
इमेज
  गाढे पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवकथेची उत्साहात सुरुवात परळी वैजनाथ दि.१९ (प्रतिनिधी)           तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे गेल्या १५२ वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता.१९) पासून शुक्रवार (ता.२५) पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.                दिडशे वर्षांची परंपरा असलेला श्री.पापदंडेश्वर पालखी सोहळ्या निमित्त शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिव कथेचा प्रारंभ झाला. या हरिनाम सप्ताहात शनिवारी सोपान महाराज नानवटे, रविवारी अॅड पांडुरंग महाराज लोमटे धाराशीव, सोमवारी माऊली महाराज खडकवाडीकर, मंगळवारी अविनाश महाराज घुले टाकळीकर, बुधवारी प्रभाकर महाराज झोलकर, गुरुवारी महादेव महाराज चाकरवाडीकर,वासुदेवानंद महाराज टाकळीकर यांचे काल्याचे किर्तन शुक्रवारी १२ ते ...

अचानक मुंबईला जावे लागल्याने पुढील दौऱ्यात परिवाराला भेटणार

इमेज
स्व.बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांना ना. पंकजा मुंडेंनी दिला मायेचा आधार! जिल्हाध्यक्षा मार्फत मदत सुपूर्द; पत्नीला नोकरी देण्याचा दिला शब्द अचानक मुंबईला जावे लागल्याने पुढील दौऱ्यात परिवाराला भेटणार बीड।दिनांक १९। भाजपचे जिल्हा विस्तारक स्व. बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांशी राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दुपारी दूरध्वनीवरून संवाद साधला. आगे कुटुंबाला आर्थिक मदत करत त्यांच्या पत्नीला नोकरी मिळवून देण्याचा शब्द त्यांनी दिला. बीडच्या पुढील दौऱ्यात आपण आगे परिवाराची  प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.    ना. पंकजाताई मुंडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत घाटशीळ पारगाव येथे नारळी सप्ताहात उपस्थित होत्या. नियोजित दौर्‍यानुसार त्या किट्टी आडगाव येथे जाऊन स्व. बाबासाहेब आगे यांच्या परिवाराला भेटणार होत्या परंतू अचानक मिटिंगसाठी मुंबईला जावे लागल्याने त्यांच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यां समवेत आगे परिवाराची त्यांच्या घरी जावून भेट घेतली व ना. पंकजाताईंनी ...
इमेज
  बहुचर्चित बडतर्फ पोलीस अधिकारी कासलेंच्या बेताल विधानांची निवडणूक विभागाने घेतली गंभीर दखल ! बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले विरुद्ध निवडणूक विभागाने परळीत केला गुन्हा दाखल  परळी वैजनाथ,......        गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमातून बेताल व निराधार वक्तव्ये करणारा बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांने परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने व ईव्हीएम मशीनच्या छेडछाडी बाबतचे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या अनुषंगाने आता निवडणूक विभागाने त्याच्या विरुद्ध परळी येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.                          याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी येथील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांनी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी भारताचे निवडणूक आयोग व शासनाची निराधार व बेताल वक्तव्य करून बदनामी केली. लोकसेवक असताना जाणिवपुर्वक भारताचे सार्वभौमत्ता व सुरक्षा धोक्यात येईल अशी खोटी वक्तव्ये केली. तसे...

रोहिण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना आणणार

इमेज
  मुख्यमंत्री आपल्यासोबत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम् सुफलाम् होईल मुख्यमंत्र्यांनी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा - ना. पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली इच्छा घाटशीळ पारगांवच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाविकांची अलोट गर्दी बीड।दिनांक १९।  श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासा करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीपासूनच खूप सहकार्य लाभले आहे, मी पालकमंत्री असताना त्यांच्या सहकार्यामुळेच इथली कामे करू शकले. मुख्यमंत्र्यांनी आता हा गड दत्तक घ्यावा, अशी अपेक्षा  राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुफलाम् सुफलाम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.    शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांचा ९३ वा नारळी सप्ताहाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मठाधिपती विठ्ठल बाबा महार...
इमेज
  बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचा खरा चेहरा उघड उसने म्हणून १० लाख रुपये खात्यावर पाठवलेले गुत्तेदार सुदर्शन काळे यांची पोलिसात तक्रार मुलाच्या फी भरण्यासाठी डिसेंबर महिन्यात घेतले होते पैसे, पुराव्यांसह काळेची तक्रार याच दहा लाखांवरून कासले करत होता भलतेच आरोप, सर्व आरोप खोटे निघाले बीड (प्रतिनिधी) - बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. रणजित कासले स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता, ते पैसे मुळात अंबाजोगाई येथील संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन चे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे. याबाबत आता सुदर्शन काळे यांनीच स्वतः पोलिसात पैसे दिल्याच्या पुरावा सहित तक्रार दाखल केली आहे.  रंजीत कासले हा पोलीस उपनिरीक्षक असताना मागील वर्षी अंबाजोगाई येथे कार्यरत होता, त्या काळात आपली त्याच्याशी ओळख झाली. डिसेंबर 2024 मध्ये रणजीत कासले याने आपल्या लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या फीची अडचण असल्याचे सांगत दहा लाख रुपयांची उसनवारी ने मागणी केली. एका कामाचे बिल आल्यानंतर मी त्यांना त...

बीड जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर

इमेज
परळी विधानसभा निवडणुक प्रक्रियेबाबत बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलेले आरोप तथ्यहीन !   निवडणूक काळात रणजित कासले याला परळी मतदारसंघात ड्युटी नव्हतीच; त्याची नियुक्ती बीड सायबर विभागात होती बीड जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर बीड (प्रतिनिधी) - विधानसभा निवडणुक २०२४ अंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक व नंतरची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडल्या असून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने काही व्हिडिओ प्रसारित करून या निवडणूक प्रक्रियेबाबत व EVM मशीनच्या बाबत केलेले संपूर्ण आरोप खोटे, निराधार व तथ्यहीन आहेत, असा अहवाल बीड जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगास सादर केला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.  बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासले यांच्या आरोपांवरून परळी विधानसभेची निवडणूक व त्यानंतरची मतमोजणी व निकालापर्यंतचे संपूर्ण प्रक्रिया याबाबत निवडणूक आयोगाने बीड जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला होता. असे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे.  या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हा निवडण...