सहभागी व्हावे -दिपक देशमुख यांचं आवाहन

सप्तश्रृंगी देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याची जय्यत तयारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार भक्तिभावनेचा सोहळा परळी / प्रतिनिधी परळीतील गणेशपार परिसर श्रद्धेच्या भावनांनी भारलेला असून, श्री सप्तश्रुंगी सेवाभावी संस्था, परळी वैजनाथ यांच्या वतीने आई सप्तश्रुंगी देवीच्या सुती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. या पवित्र सोहळ्यास आषाढ शुद्ध नवमी, शुक्रवार दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार असून दुपारी ०१.११ वाजता शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. यानंतर भाविकांसाठी दुपारी २ ते ४ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शोभेची मिरवणूक व गोंधळ मिरास श्री सप्तश्रुंगी सभागृह, गणेशपार येथून निघणारी मिरवणूक ही गणेशपार – नांदुरवेस – अंबेवेस – श्री वैद्यनाथ मंदिर – नेहरू चौक – मोंढा – रोडे चौक – टॉवर – गणेशपार मार्गे परत अशी असणार आहे. रात्री जागरण गोंधळ, अग्निकुंडातून चालणे आणि सप्तश्रृंगी देवीचा लगेच कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्याचे प्...