पोस्ट्स

इमेज
योगेश्वरी पतसंस्थेच्या वतीने एस पी कुलकर्णी सन्मानित  सतत वीस वर्ष अध्यक्षपदावरून केला पतसंस्थेचा विकास - माजी अध्यक्ष एस पी कुलकर्णी   अंबाजोगाई( वसुदेव शिंदे ) - परवा पतसंस्थेचे अध्यक्ष बी के मसने यांचा फोन आला. आपल्याला पतसंस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि जवळपास वीस वर्षांचा कालखंड आठवला. वीस वर्षे इतरांचे सत्कार करण्यात गेले. आज आपला सन्मान होणार. साहजिकच मन आनंदी होणार व वीस वर्षे सातत्याने पतपेढीत एकरूप होऊन काम केले, आपल्याला जे पद मिळाले ते जनसेवेसाठी होते ते मिरवण्यासाठी नव्हते हाच विचार. देह व देव यामध्ये देश आहे. याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. मानव सेवा हीच माधव सेवा समजून काम केले.  अगदी वयाच्या 32 व्या वर्षी माझ्या गळ्यात पतपेढीचे अध्यक्षपदाची माळ पडली. तसे पाहिले तर माझा आणि सहकाराचा काहीही संबंध नाही. काहीही माहित नाही. प्रथम निवडणुकीला उभा राहिलो व सभासदांनी मला निवडून दिले. पतसंस्थेचा माझ्या संबंध नोकरीला आल्याबरोबर आला. निवडणूक आल्यावर डोक्यातही नव्हते आपण अध्यक्ष व्हावे. पण नियतीने पहिल्यांच टर्ममध्ये अध्यक्षपदाची माळ घातली. तसे आम्ही...

खासदार झाले आता सरकारी वकील म्हणून काम करता येतं का?

इमेज
उज्वल निकमांची राज्यसभेवर वर्णी, संतोष देशमुख केस पाहणार का? कायदा काय सांगतो? विशेष सरकारी वकील उज्वल निकम    यांची राज्यसभेवर   वर्णी लागली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. उज्वल निकम यांनी 2024 च्या लोकसभेला उज्जल निकम यांनी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला होता.         दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर ते विशेष वकील म्हणून काम पाहू शकणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. उज्वल निकल संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस पाहणार की नाही याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभा सदस्यपदावरील एखादी व्यक्ती “विशेष सरकारी वकील” (Special Public Prosecutor) म्हणून राहू शकत नाही. सामान्यतः एकाच वेळी एखाद्या व्यक्तीला राज्यसभेचा सदस्य आणि सरकारी वकील (विशेष सरकारी वकीलसुद्धा) ही दोन्ही पदं ए...

ॲड.उज्ज्वल निकम झाले खासदार!

इमेज
मोठी बातमी: उज्ज्वल निकम यांची  राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्याबरोबरच भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता. लोकसभेला पराभव झाल्यानंतर आता उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवण्यापर्यंत वकील उज्वल निकम यांची मोलाची भूमिका राहिली होती. उज्वल निकम यां...
इमेज
  पौरोहित्य करणाऱ्यांना शासनाकडून आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल - अशिष दामले अंबाजोगाई - (वसुदेव शिंदे)- पौरोहित्य करणाऱ्यांचे प्रश्न तसेच त्यांच्या समस्या,अर्थिक लाभ या विषयी शासनाच्या वतीने मदत करण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्या भावना उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या पर्यंत मांडण्यात येतील असे आश्वासन परशुराम अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अशिष दामले यांनी  दिले.अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमात कॅप्टन अशिष दामले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ धाट होते.  त्यांनी अंकुरच्या कामाचा आढावा थोडक्यात मांडला. कोष्टगांवकर गुरूजी व इतर शिष्य वृंदानी श्रीमद्भगवद्गीतेच्या एक ते अठरा अध्यायाचे पठण केले यात अनेकांनी सहभाग घेतला.अंकुर प्रतिष्ठानचे समन्वयक सुधीर धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक व परिचय केले. संचालन दिलीप कुलकर्णी तर अंकुर प्रतिष्ठानचे कार्यवाह सुभाष देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी पेशवा संघटनेचे पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते. ----------------------------------------------- Click: ♦️...
इमेज
पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी असल्यास सातबारा- आठ -अ मागणी करू नये - अनिल बोर्डे गेवराई ,प्रतिनिधी :- राज्य सरकारने चालू वर्षापासून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्री स्टॅक योजनेच्या अंतर्गत मिळालेला फॉर्मर आयडी अनिवार्य केला आहे.  फार्मर आयडी दिल्यानंतर कोणत्याही कागदपत्राची गरज शेतकऱ्यांना लागणार नाही पण महा डीबीटी पोर्टल अंतर्गत विविध योजनेचा शेतकऱ्याकडून सातबारा व आठ मागणी केल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात कृषी संचालकाने शेतकऱ्यांनी फॉर्म आयडी दिल्यानंतर इतर कागदपत्राची मागणी करू नये असे निर्देश दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे यासाठी यंदाच्या खरीप हंगाम पिक विमा योजनेचा व इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी अनिवार्य असणार आहे अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेतला नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत बीड ग्राहक पंचायत महाराष्ट्र मार्फत वारंवार फार्मर आयडी काढून घेण्याबाबत आवाहन केलेले आहे.  तरी सर्व शेतकऱ्यांना फॉर्मर आयडी काढून घ्यावा यापुढे पिक विमा भरण्यासाठी व इतर शासकीय कामासाठी फॉर्...
इमेज
  गाडीलोहार समाज युवा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - गेंदले महाराज परळी (प्रतिनीधी ) येथील सोमवंशी आर्य क्षत्रिय गाडीलोहार समाज युवा प्रतिष्ठान परळी वैजनाथ च्या वतीने शुक्रवार दि.11जुलै रोजी मातृ-पितृ पूजन व अमृततुल्य प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना ह.भ.प भागवताचार्य बाळासाहेब महाराज गेंदले यांनी सोमवंशी आर्य क्षत्रिय गाडीलोहार समाज युवा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले.                     शहरातील नंदागौळ रोड वरील विश्वकर्मा मंदिर येथे गुरु पौर्णिमेनिमित्त मातृ-पितृ पूजन व तांबेश्वर संस्थांनाचे श्री.ह भ प स्वररत्न श्री भगवताचार्य बाळासाहेब महाराज गेंदले यांच्या अमृततुल्य श्रीगुरु प्रवचन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. ह्या आनंदी महोत्सवास परिसरातील समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थिती दर्शविली. ----------------------------------------------- Click: ♦️ _नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा: ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय!_ > _प्रवेश अर्जासाठी केंद्र सरकारचे ओब...
इमेज
महाडायलेसिस सेंटरचे जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन  आ. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून लवकरच परळी मध्ये MRI सेंटर सुरू करणार - डॉ संतोष मुंडे परळी (प्रतिनिधी):दिनांक १३ जुलै      आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी तालुका व परिसरातील किडनी विकार रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे ८ डायलिसिस मशीन असणाऱ्या अद्यावत महाडालेसिसी सेंटरचे बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय राऊत सर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे गटनेते अजय मुंडे ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे ,राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष भैया धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष वैजनाथ सोळंके, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे ,जेष्ठ नेते तुलशीराम पवार,एच एल एल लाइफ केयर कंपनीचे प्रशांत सर , रा का.चे डॉ. विनोद जगतकर सर, मनसेचे श्रीकांत पाथरकर, वैजनाथ कळसकर,हरीश नागरगोजे , शेख शरीफ भाई, युवक अध्यक्ष शेख एजाज़ भाई, राहुल तिड़के, मुं...