पोस्ट्स

इमेज
आ. धनंजय मुंडे यांचे स्पष्ट निर्देश ; श्रावणापूर्वी परळीतील ८४ खोल्यांचे भक्तनिवास होणार सुरू ! भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा कंत्राटदाराला सोबत घेत सर्व संबंधितानी घेतला आढावा परळी वैजनाथ | प्रतिनिधी       बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे सुसज्ज भक्तनिवास आगामी श्रावण महिन्यापूर्वी सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या निर्देशानंतर संबंधित यंत्रणांनी भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा आढावा घेत नियोजन निश्चित केले आहे.        परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत माजी मंत्री धनंजय मुंडे व ना. पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाला होता. या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, विविध कारणांमुळे पोलीस स्टेशनजवळ उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे भक्तनिवास  अपूर्ण अवस्थेत पडून आहे.या पार्श्वभूमीवर ही बाब धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबं...

हार्दिक शुभेच्छा!!!!

इमेज
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या परळी तालुकाध्यक्ष पदी प्रल्हाद कंडूकटले तर शहराध्यक्षपदी रंगनाथ सावजी यांची एकमताने निवड कार्याध्यक्षपदी सुमित गिरी, उपाध्यक्षपदी अरुण सपाटे तर सचिवपदी मोहन चव्हाण  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या बीड जिल्हा शाखे अंतर्गत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या परळी तालुकाध्यक्षपदी प्रल्हाद कंडुकटले यांची तर शहराध्यक्षपदी रंगनाथ सावजी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाची आज शासकीय विश्राम गृह येथे दैनिक दिव्यअग्निचे मुख्यसंपादक तथा जेष्ठ मार्गदर्शक प्रकाशजी सुर्यकर यांच्या अध्यक्षतेखाली व दैनिक महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत नुतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. ती पुढील प्रमाणे तालुकाध्यक्ष प्रल्हाद कंडुकटले (दैनिक हिंद जागृती), कार्याध्यक्ष सुमित गिरी (दैनिक बीडसत्ता), उपाध्यक्ष अरूण सपाटे (परळीचा आवाज), सचिव मोहन चव्हाण (दै.युवा मराठा) स...

आणखी एका न्यायालयीन लढ्यात धनंजय मुंडेंचा विजय!

इमेज
धनंजय मुंडेंच्या विधानसभा निवडणुकीतील शपथपत्रा विरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचा  आणखी एका न्यायालयीन लढ्यात विजय झाला आहे. विधानसभा निवडणूक 2024 मधील त्यांच्या उमेदवारी अर्ज सोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेत लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने निकाल दिला असून सदर प्रकरणातील सर्व आरोप तथ्यहीन असल्याने ते फेटाळून लावले आहेत.   धनंजय मुंडे यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद माहितीवरून करुणा शर्मा यांनी वेगवेगळे आरोप करत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.  याप्रकरणी परळीच्या प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली, करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब, वकिलांचा युक्तिवाद यांसह वस्तुस्थिती लक्षात घेत न्यायालयाने...

जम्बो कार्यकारणी जाहीर...... हार्दिक अभिनंदन!!!!!

इमेज
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न परळी पत्रकार परिषदेची जम्बो कार्यकारणी जाहीर :तालुकाध्यक्ष धीरज जंगले, शहराध्यक्ष किरण धोंड तालुका कार्याध्यक्ष आत्मलिंग शेटे, तर तालुका सचिवपदी दिगंबर देशमुख, शहर सचिवपदी माणिक कोकाटे, तालुका सहकोषाध्यक्षपदी गणेश आदोडे, तालुका उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड, तालुका कोषाध्यक्षपदी संदीप मस्के, शहर कार्याध्यक्षपदी अनंत कुलकर्णी, शहर उपाध्यक्षपदी अभिमान मस्के आदींची निवड  परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखली जाते. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच विभागीय संघटक सुभाष चौरे, विभागीय सचिव रवी उबाळे, बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे, गजानन मुडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुक्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात सर्वानुमते परळी तालुका अध्यक्षपदी धीरज जंगले, शहराध्यक्षपदी किरण धोंड, तालुका कार्याध्यक्षपदी आत्मलिंग शेटे तर सचिवपदी दिगंबर देशमुख यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या वतीने दि.6 जानेवारी 2026 रोजी दर्पण दिन परळी शहरात मोठ्या उत्स...

भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन....

इमेज
  नागापूर येथे 31 डिसेंबरपासुन  नागनाथ महाराजांची यात्रा परळी (प्रतिनिधी) तालुक्यातील नागापूर येथील ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांची वार्षिक भव्य यात्रा ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान होत आहे.            ३१ रोजी रात्री नागनाथ मंदिरात किशोर महाराज सूर्यवंशी यांचे कीर्तन होईल. १ जानेवारी रोजी सकाळी वरपगाव येथील भगवान महाराज मोरे यांचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. याच दिवशी रात्री १२ वाजता श्रीनागनाथ महाराजांची पालखी मिरवणूक निघणार आहे. २ रोजी सकाळी पालखीची आरती व दुपारी जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन नागनाथ देवस्थानचे सचिव कुंडलिकराव सोळंके, अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ तसेच विश्वस्त अर्जुन सोळंके, हनुमंत कुलकर्णी, प्रभाकर आप्पा तोंडरे यांनी केले आहे.

खरेदीचा आनंद लूटा.....शॉपिंग स्टॉल्स

इमेज
  संक्रांती स्पेशल शॉपिंग महोत्सवाचे दोन दिवस आयोजन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         संक्रांतीनिमित्ताने शॉपिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात खरेदीचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन गृहलक्ष्मी शॉपिंग महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.          गृह लक्ष्मी ग्रुप तर्फे नेहमी प्रमाणे 3,4 जानेवारी ला संक्रांती स्पेशल शॉपिंग महोत्सव आहे ,त्या मधे  सर्व प्रकारचे घरगुती वस्तू , होम मेड सौंदर्य प्रसाधने, साबण, ज्वेलरी, ओरिफ्लेम ,मिटृकुल कंपनीनेच मातीचे बाॅटल,कुकर , माट,,इ. वूलेन च्या वस्तू वन ग्राम ज्वेलरी,मसाले , लोणचे, खाऊ स्टॉल , डेकोरेटेड वस्तू,ड्रेस, रेडिमेड्स मिट्टी कूल वस्तू अशा बराच काही प्रकारच्या वस्तू असतात तर हे एक्जिबिशन विठ्ठल मंदिर, जाजू वाडी,पद्मावती गल्ली येथे परळी वैजनाथ येथे आहे, तरी सगळ्यांनी सह कुटुंब शॉपिंग यावे असे आवाहन गृह लक्ष्मीग्रुप संचालक सौ. प्रीती टाक यांनी केले आहे.
इमेज
  मराठी साहित्य हे पर्यावरण संवेदनेने समृद्धआहे." - प्रा.संजय आघाव परळी , दि.२९ /१२ /२०२५ (प्रतिनिधी )     येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगरच्या विद्यापीठ विकास मंडळाच्या मान्यतेने व अनुदानाने घेण्यात येत असलेल्या व्याख्यानमालेत बोलत असताना प्रा.संजय आघाव यांनी यावेळी "मराठी साहित्य हे पर्यावरण संवेदनेने समृद्धआहे." असे मत मांडले. साहित्यातील पर्यावरणीय जागरूकतेचे विश्लेषण करत त्यांनी यावेळी निसर्गाशी निगडित साहित्यिक कल्पना आणि समकालीन आव्हानांचा उल्लेख केला.हे व्याख्यान मराठी साहित्यातील पर्यावरण संरक्षणाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे ठरले.यावेळी प्रा.डॉ.राजाभाऊ धायगुडे यांनी  प्रा.वा.ल.कुलकर्णी यांचे साहित्य क्षेत्रात समीक्षक म्हणून असलेले योगदान यावर प्रकाश टाकत टाकत या व्याख्यानमालेबद्दल गौरवोद्गार काढताना, "साहित्याची सामाजिक जबाबदारी उजळणारी ही व्याख्यानमाला आहे. " असे मतही नोंदविले. प्रा. डॉ. राजाभाऊ धायगुडे यांनी यावेळी प्रा.वा.ल. कुलकर्णी यांचा वाङ्मयीन दृष्टिकोन आणि कलावादी विचार ,लेखनाती...

परळी वैजनाथ नवीन वकील संघ

इमेज
  परळी वैजनाथ वकील सघांच्या अध्यक्षपदी ॲड. डि. पी. कडबाने तर सचिवपदी ॲड. विलास बडे उपाध्यक्षपदी ॲड.धनाजी कांबळे यांची बिनविरोध निवड  परळी वैजनाथ, प्रतिनिधी ....       परळी वकील संघाच्या अध्यक्षपदी जेष्ट विधीज्ञ ॲड डि पी कडबाने उपाध्यक्षपदी ॲड धनाजी कांबळे तर सचिवपदी ॲड विलास बडे यांची बिनविरोध सहसचिव शेख शाकेर महिला प्रतिनिधी म्हणून ॲड शुभांगी गित्ते व ॲड पुनम पाळवदे यांची निवड करण्यात आली.    परळी वकील संघाचे सन 2026 या वर्षीकरिता निवडणूक घेण्यात आली होती.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड दत्तात्रय आंधळे  यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड व्हि एम जगतकर यांनी काम पहिले. प्रसंगी परळी वकील संघाचे मावळते अध्यक्ष ॲड एच व्ही गुट्टे ॲड आर.व्हि.गित्ते अँड प्रदिप गिराम ॲड आर व्हि देशमुख ॲड जीवनराव देशमुख ॲड मिर्झा मंजुर ॲड लक्षमण अघाव अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे ॲड दिलीप स्वामी ॲड प्रभाकर सातभाई ॲड प्रकाश मराठे ॲड वसंतराव फड  ॲड दस्तगीर ॲड शेख शकीक ॲड डि.एल.उजगरे.ॲड नागापूरकर ॲड बी डी उजगरे ॲड मोहन कराड ॲड अनिल मुंडे ॲ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या