ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी
ओंकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी तुटपुंजे बिल देत शेतकऱ्यांची फसवणूक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सत्याग्रह आंदोलन सुरूच परळी / प्रतिनिधी...ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली ऊस बिलाची रक्कम, तोडणी मजुरी, वाहतूक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे याबाबत ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने वारंवार निवेदने, भेटी घेऊन मागील चार महिन्यापासून प्रत्येक वेळी आश्वासनाची पोकळ बोळवण करून वेळ मारून नेत वेळ काढूपणा सुरू असल्याने शुक्रवार दि 8 रोजी ऊस उत्पादक संघर्ष समितीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले. आंदोलनाची धास्ती घेत जानेवारी महिन्यातील गाळप केलेल्या ऊस देयक पोटी 1800 देय करत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने शेतकरीच्या सहनशीलतेचा अंत झाला असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. ऊस गळीत हंगाम सुरू होताना ओंकार शुगर्स कडून 2950 रु भाव जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अमिष दाखवत ऊस गाळप सुरू केला. गाळप हंगामापासून ते दि 15 जानेवारी गाळप केलेल्या ऊस देयक पोटी शेतकऱ्यांना 2950 रुपयांनी ऊस देयक ओंकार साखर कारखान्याने अदा केली मात्र तदनंतर गाळप झालेल्या ऊसाची देयके 3 महिन्याचा ...