पत्नी नगराध्यक्ष, पती नगरसेवक : परळीत दुसऱ्यांदा इतिहास
पत्नी नगराध्यक्ष, पती नगरसेवक : सोमनाथ आप्पा हालगे दाम्पत्यानंतर बाजीराव धर्माधिकारी दांपत्यही जोडीने पदावर दिसणार ! परळी वैजनाथ दिनांक 14 परळी वैद्यनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची नगराध्यक्षपदी जनतेमधून थेट निवडणूक होऊन निवड झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांचे पती बाजीराव धर्माधिकारी यांची निवड निश्चित झाली आहे पती नगरसेवक आणि पत्नी नगराध्यक्ष असे चित्र या निमित्ताने परळीत दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहे. लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद किंवा जिल्हा परिषद नगरपालिकेत पती पत्नी हे दोघेही एकदाच एका सभागृहात अशा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक घटना आपण पाहिलेले आहेत मात्र एखाद्या नगरपालिकेत पत्नी नगराध्यक्ष आणि पती नगरसेवक अशी घटना परळी मध्ये सलग दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहे सन 2017 मध्ये झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत सौ सरोजिनीताई सोमनाथ आप्पा हलगे या नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून निवडून आल्या होत्या स्वीकृत नगराध्यक्षाच्या वेळी श्री सोमनाथ आप्पा हालगे यांची नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती त्या पाठ...