पोस्ट्स

वैद्यनाथाची प्रतिमा दिसताच उद्धव ठाकरे नतमस्तक!!!

इमेज
परळीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत; ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीतून फुलांचा वर्षाव परळी वैजनाथ :  प्रतिनिधी....      शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी दौरा आटोपून धाराशिवकडे जात असताना परळी शहरात शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. छत्रपती संभाजी महाराज चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या स्वागत सोहळ्यात जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.         या स्वागत सोहळ्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.परळीतील नागरिकांच्या वतीने उद्धव ठाकरे यांना श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची प्रतिमा भेट देण्यात आली. ही प्रतिमा स्वीकारताना उद्धव ठाकरे यांनी ती मस्तकाला लावून  अभिवादन केले. अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात स्वागत -------------------   परळी वैजनाथ शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माज...

कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...

वाकेकर प्रतिष्ठान व म. सा. प.चा संयुक्त उपक्रम*

इमेज
स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शालेय साहित्याचे वाटप उपक्रम  वाकेकर प्रतिष्ठान व म. सा. प.चा संयुक्त उपक्रम परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहर व परिसरातील शाळांमधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.         सामाजिक बांधिलकी जपत गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम सातत्याने चालत आला असून याही वर्षी समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक उत्तरदायित्वाची भावना म्हणून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचची माहिती वाकेकर प्रतिष्ठान व परळी म.सा.प.चे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर व परळी म.सा.प.चे सचिव राजकुमार यल्लावाड यांनी दिली आहे. समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांचा आज स्मृतीदिन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करणारे समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांचा उद्या शुक्रवार दि. 27 जून स्मृतिदिन आहे. यानिमित्त समाधीस्थळी अभिवादन, शाळांमध्ये करणार शालेय ...
इमेज
  समर्पित व्यक्तिमत्त्वाचे धनी - स्व. सुवालालजी (ललवाणी) वाकेकर     समाजभूषण स्वर्गीय सुवालालजी (ललवाणी) वाकेकर… हे केवळ एका समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व नव्हते तर सर्वच समाजासाठी ते एक  संस्कारांचे विद्यापीठ, माणुसकीचा अखंड झरा आणि कर्तृत्वाचा दीपस्तंभ होते.     माणूस मोठा त्याच्या संपत्तीने नव्हे तर त्याच्या विचारांनी, सेवाभावाने आणि माणुसकीने मोठा होतो ही त्यांनी दिलेली शिकवण आजही परळी आणि परिसरातील सर्वच समाजाला सर्व जाती-धर्माला  खऱ्या अर्थाने घालून दिलेला एक स्तुतिपाठ म्हणावी लागेल.      आयुष्यभर स्वतःपेक्षा समाजकार्याला  प्राधान्य देत असंख्य गरजूंच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारे सुवालालजींचे  कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहे.  सुवालालजींच्या चेहऱ्यावरील साधेपणा,मनातील उदारता आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव हा आजही इतरांना प्रेरणादायी असाच आहे.  या जगामध्ये सुवालालजी सारखी मोजकीच माणसे असतात की ज्यांचं चांगुलपण कुठल्याच मोजपट्ट्यात मोजता येत नाही.         दूरवर पसरल...
इमेज
  ग्लोबल विकास ट्रस्ट आणि परळी नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; पथनाट्यातून दिला वृक्षसंगोपनाचा संदेश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंगोपनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी परळी शहरात आज एका विशेष जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल विकासच ट्रस्ट, नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक वृक्षसंवर्धन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज, शुक्रवार २६ जून रोजी शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये मोंढा मार्केट, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नेहरू चौक तळ परिसराचा समावेश होता. या पथनाट्याला परळीकरांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाट्यातून दिला 'झाडे लावा, झाडे जगवा'चा संदेश वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल या पार्श्वभूमीवर मानवी जीवनात वृक्षांचे काय महत्त्व आहे, हे कलाकारांनी आपल्या प्रभावी अभिनयातून मांडले. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज कशी बनली आहे, यावर पथनाट्यातून प्रकाश टाकण्यात आला. पाणीटंचाई, ग्लोबल वॉर्मिंग आण...
इमेज
  परळी येथे छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी शाहु महाराजांनी समता आणि बंधुता याची पेरणी केली-सौ.पद्मश्री धर्माधिकारी परळी वै.  - छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती महिला महाविद्यालयाच्या सभागृहीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.  समता आणि बंधूता यावर वक्त्यांनी आपला भर दिला. राजर्षी शाहु महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोकांचा रोष पत्करून आपल्या राज्यामध्ये आरक्षण अंमलात आणले. प्रत्यक्षामध्ये स्वतः सर्व क्षेत्रामध्ये पुढाकार घेवून जातीजातीतील भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाचे जनक म्हणुन त्यांची ओळख आहे. आजही सर्वांना त्यांची आठवण कायम राहते. विशेष म्हणजे यावेळी सर्व पाहुण्यांचा सत्कार हारांनी न करता झाडांची रोपटे देवून केला.  या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटक परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी न.प. चे बांधकाम सभापती पवन मुंडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणुन वंचित आघाडीचे महासचिव मिलिंद घाडगे, नगरसेवक अनंत इंगळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज...