पोस्ट्स

पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य देण्याचे आवाहन....

इमेज
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेवरून परळीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्मिती; भाजपा नगरसेवकांचे श्रमदान परळी वैजनाथ: प्रतिनिधी पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांच्या सूचनेनुसार यंदाच्या गणेशोत्सवात जलप्रदूषण रोखण्यासाठी परळी नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातील हरिहर तीर्थासमोर गणेश विसर्जनाची कृत्रिम तलाव निर्मिती सुविधा करण्यात आली आहे. भाजपा नगरसेवकांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून परिसरात स्वच्छता व तयारीसाठी स्वतः श्रमदान केले. यंदा पाऊस कमी असल्याने नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. धार्मिक भावना जपत नागरिकांनी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या या पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये महिला बालकल्याण सभापती सौ. अंजलीताई माळी लोखंडे, अश्विन मोगरकर, राहुल केंद्रे, केशव नागरगोजे आणि अश्विनकुमार आघाव यांचा समावेश होता. या पाहणीदरम्यान विसर्जनाची व्यवस्था, नागरिकांची...
इमेज
परळीतील संशोधक युवकाच्या ‘स्मार्ट शेती’ संकल्पनेतील उपकरण डिझाईनला केंद्राची मान्यता ! प्रा.डॉ.गिरीश चाटे यांच्या मृदा प्रतिमा ओळख व पीक शिफारस उपकरण डिझाइनला भारत सरकारचे पेटंट परळी वैजनाथ : प्रतिनिधी     शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.  ‘डीप लर्निंग-बेस्ड सॉईल इमेज रिकग्निशन अँड क्रॉप रिकमेंडेशन डिव्हाइस’ या उपकरणाच्या डिझाइनची भारत सरकारच्या पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीचे प्रमाणपत्र गिरीश दशरथ चाटे  यांच्या नावावर जारी करण्यात आले आहे. यामुळे परळीतील युवकाच्या ‘स्मार्ट शेती’ संकल्पनेला केंद्राची मान्यता मिळाली आहे.गिरीश दशरथ चाटे यांच्या मृदा प्रतिमा ओळख व पीक शिफारस उपकरण डिझाइनला भारत सरकारचे पेटंट मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.         भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या पेटंट कार्यालयाने गिरीश चाटे यांच्या या डिझाइनला नुकतेच पेटंट प्रमाणपत्र जारी केले आहे. या उपकरणाच्या न...
इमेज
श्री गणेश मंडळाच्या रक्तगट व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ४७ जणांची रक्तगट तपासणी; ३० जणांची बीपी तर २५ जणांची शुगर तपासणी परळी वैजनाथ (संजय क्षिरसागर) - येथील हनुमान मंदिर, सुभाष चौक परिसरातील श्री गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तगट व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मंगळवार, दि.२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ४७ नागरिकांची रक्तगट तपासणी, ३० जणांची रक्तदाबाची (बीपी) तपासणी, तर २५ जणांची रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली. नागरिकांना आपल्या आरोग्याची प्राथमिक माहिती एकाच ठिकाणी मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिबिराचे उद्घाटन परळी शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा ढाकणे तसेच समाजसेवक मुन्ना भैया बागवाले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमातून जपलेली सेवाभावाची परंपरा कौतुकास्पद असल्याचे सांगत, अशा आरोग्यविषयक उपक्रमांची सातत्याने गरज असल्य...

युवा शेतकरी संघर्ष समितीने मानले आभार...

इमेज
ना.पंकजा मुंडेंची यशस्वी मध्यस्थी ; माजलगांव धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय स्थगित ना. पंकजा मुंडेंच्या पुढाकाराने विखे पाटील यांनी घेतली मंत्रालयात बैठक ; युवा शेतकरी संघर्ष समितीने मानले आभार मुंबई दि. २२ ---- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे  माजलगांव (जि.बीड) धरणाची उंची वाढविण्याचा सरकारने घेतलेला निर्णय  स्थगित केला आहे, याबाबत फेर सर्वेक्षण करून नंतरच निर्णय घेतला जाईल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, हा निर्णय स्थगित केल्याबद्दल युवा शेतकरी संघर्ष समितीने ना. पंकजा मुंडे तसेच विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.     राज्य सरकारने माजलगांव धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला होता यामुळे धरण परिसरातील बावीस गावच्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून हा निर्णय रद्द व्हावा यासाठी आंदोलन सुरू केले होते, काही दिवसापूर्वी जलसमाधी आंदोलनही त्यांनी केले होते. या आंदोलक शेतकऱ्यांनी माजलगांव मधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यां मार्फत ना. पंक...

कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय

इमेज
पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे सकारात्मक निर्णय पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय मुंबई, दि. २२ : पशुधन पर्यवेक्षक / सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता लागू करण्यासंदर्भात सकारात्मक असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच राज्यात 10 वी नंतर दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम बंद करून 12 वी विज्ञान नंतर दोन वर्षाचा पशुविज्ञान विषयासह पदविका अभ्यासक्रम चालू करण्यासंदर्भात तपासून निर्णय घेण्यात येईल, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले. पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा कायम प्रवास भत्ता, पदांचे तर्कसंगत वाटप, पदोन्नती, रिक्त पदभरती, पदविका अभ्यासक्रमाचा दर्जा, तालुका स्तरावरील अधिकार तसेच पशुवै...

महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ..

इमेज
श्री गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात २५ युवकांचे रक्तदान परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) - येथील हनुमान मंदिर, सुभाष चौक परिसरातील श्री गणेश मंडळाच्या वतीने रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी व सेवाभाव जपत रक्तदान शिबिर तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५ युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान—रक्तदान करून जीवनदान द्या” या संदेशाने प्रेरित होऊन युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिरानंतर दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांसह शहरातील अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रक्तदान हे केवळ रक्तदान नसून गरजू रुग्णाच्या जीवनासाठी मोलाचे योगदान देण्याचे कार्य आहे. त्यामुळे युवकांसह नागरिकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात...

लाभ घेण्याचे आवाहन..

इमेज
श्री गणेश मंडळातर्फे आज रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन परळी वैजनाथ (संजय क्षिरसागर) - येथील हनुमान मंदिर, सुभाष चौक परिसरातील श्री गणेश मंडळाच्या वतीने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत रक्तगट तपासणी (आरोग्य तपासणी) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत श्री गणेश मंडळाने या आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांना आपल्या रक्तगटाची माहिती असणे अत्यंत आवश्यक असून, भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासल्यास ही माहिती उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. हनुमान मंदिर, सुभाष चौक, परळी वैजनाथ येथे हे शिबिर होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, तसेच या सामाजिक उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.