SIR रद्द करा; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करा जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचा CJP ला पाठिंबा परळी : प्रतिनिधी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेमुळे पात्र नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आणि त्यातून मतदानाच्या अधिकारावर परिणाम होण्याची चिंता व्यक्त करत जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राने SIR प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. पात्र असूनही वगळण्यात आलेली नावे तातडीने पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी केली. SIR प्रक्रियेबाबतच्या शंका, मतदारांची नावे वगळण्यासंबंधीच्या तक्रारी आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकार यांची पारदर्शक व कायदेशीर चौकशी करावी, अशी संघटनेची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. चौकशीत निवडणुकीतील गैरप्रकार सिद्ध झाल्यास संबंधित मतदारसंघांत पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली. तसेच CAA रद्द करण्यासह प्रस्तावित NRC, NPR आणि संबंधित उपाययोजना रद्द करण्याची भूमिकाही...