पोस्ट्स

पदवीधर मतदारसंघ निवडणूक: ....

इमेज
  परळीत नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क परळी वैजनाथ प्रतिनिधी...    विधानपरिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील  निबडणुकीसाठी आज (दि.२३) मतदान प्रक्रिया झाली. या अनुषंगाने परळीच्या उच्चविद्याविभुषित नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.        पदवीधर मतदारसंघातील  निबडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून  मतदानाची प्रक्रिया सुर झाली. पदवीधरांच्या हक्काचा मतदार संघ म्हणून राज्याच्या वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व देणाऱ्या या मतदारसंघाचे विशेष महत्त्व आहे या निवडणुकीसाठी परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी जि.प. कन्या शाळा मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनीही पदवीधर मतदारसंघासाठी आपले मतदान केले. सक्षम व सुदृढ लोकशाही मधील महत्त्वाचा अधिकार म्हणजे मतदान असतो.  पदवीधरांच्या न्याय हक्कासाठीचा स्वतंत्र मतदारसंघ असलेल्या पदवीधर मतदार संघात आपला हक्काचा प्रतिनिधी पाठवण्य...
इमेज
  इनरव्हील क्लबच्या वतीने ‘महाशक्तीचा जागर’; तुळजाभवानी मातेचे पूजन व भजनाचा भक्तिमय सोहळा परळी : नवरात्रोत्सवानिमित्त इनरव्हील क्लबच्या वतीने ‘महाशक्तीचा जागर’ हा धार्मिक उपक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. क्लबच्या अध्यक्षा आशा उत्तम धुमाळ यांच्या पुढाकारातून तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना करून भजन व पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. क्लबच्या उपाध्यक्षा उमा समशेट्टी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी सादर करण्यात आलेल्या सुंदर भजनांनी उपस्थित महिला मंत्रमुग्ध झाल्या. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात उपस्थित महिलांना फलाहार देण्यात आला. तसेच महिलांची ओटी भरून त्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून महिलांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला क्लबच्या अध्यक्षा आशा धुमाळ, उपाध्यक्षा उमा समशेट्टी, खजिनदार अनिता धुमाळ, सुचिता करमाळकर, सुनीता वाघमोडे, मनीषा खाकरे, शुभांगी गीते यांच...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन....

इमेज
परळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रविवारी विजयादशमी उत्सव : सघोष पथसंचलन व मान्यवरांचे मार्गदर्शन  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :           राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त परळी वैजनाथ येथे दरवर्षीप्रमाणे श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात शहरात सघोष पथसंचलन व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. हिंदू समाजातील सामूहिक शक्ती आणि शौर्य जागृत करण्याच्या उद्देशाने स्वयंसेवक व नागरिकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.     रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वा. औद्योगिक वसाहत वैद्यनाथ क्रीडा संकुल, शिवम सुपर शॉपी मार्गावरील बाजूस   येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक उमाकांत अंकुशराव इंगळे प्रमुख अतिथी म्हणून  तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जालना विभाग प्रचारक भरत देशपांडे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. संघाच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याचा आणि शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. या...

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.....

इमेज
बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी २६ ऑक्टोबरला बीडमध्ये धडक मोर्चा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :          बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी शासकीय कामगार अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, बंद पडलेल्या योजनांचा प्रश्न मार्गी लागावा आणि प्रलंबित आर्थिक मदत मिळावी, यांसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचे प्रा.बी.जी. खाडे यांनी सांगितले.             बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार संघटनेने केली आहे. कामगारांना आर्थिक सहाय्य, मुलांच्या शिक्षणासाठी मदत तसेच इतर कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कामगारांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी करावी, या उद्देशाने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी मह...

पोलीस कर्तव्याबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन...

इमेज
खाकी वर्दीतील माणुसकी; नवजात बाळाच्या मृत्यूनंतर आर्थिक अडचणीतील कुटुंबाला आधार ! परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        नवजात बाळाच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या आणि आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या एका कुटुंबाला संभाजीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप गोंड यांनी मदतीचा हात दिला. मृत बाळाचे शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई येथे जाण्याकरिता वाहनाची व्यवस्था करणे कुटुंबाला कठीण जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आर्थिक मदत केली. त्यांच्या या कृतीतून कर्तव्य बजावताना सामाजिक संवेदनशीलता जपण्याचे उदाहरण समोर आले आहे.            मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने दोन दिवसांपूर्वी तिची प्रसूती घरीच झाली होती. त्यानंतर नवजात बाळाची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर बाळाला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवला. या प्रकरणी पंचनामा करण्यासाठी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप गोंड घटनास्थळी आले होते. ...
इमेज
समाजनिर्मितीत शिक्षकाची भूमिका मोलाची ! - डॉ. होनराव हुलगुंडे गुरुजींचे कार्य प्रेरणादायक-- माणिक गुट्टे   परळी वैजनाथ - दि. १९-- शिक्षक हा  शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच आपल्या कृतिशील जीवनाने सामान्य जनतेचाही मार्गदर्शक असून  समाजाच्या नवनिर्मितीत त्याची भूमिका मोलाची ठरते, असे विचार प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव यांनी मांडले .         सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शिक्षक श्री लक्ष्मणराव हुलगुंडे गुरुजी यांचा अमृत महोत्सवी गौरव समारंभ काल (दि. १८) येथील अक्षदा मंगल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्री  होनराव बोलत होते. अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. श्री माणिकराव गुट्टे (माजी सहसचिव मंत्रालय)हे होते.      डॉ.श्री होनराव यांनी लक्ष्मणराव हुलगुंडे गुरुजी यांनी एक चारित्र्यसंपन्न पिढी घडवून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आदर्शांचा मानबिंदू उभा केला आहे,असे गौरवोद्गार काढले. तर अध्यक्षीय भाषणात श्री गुट्टे यांनी मानवी जीवनात गुरुंचे स्थान सर्वाधिक श्रेष्ठ असून परिस्थितीला...
इमेज
कर्करोग जनजागृतीपर व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती संभाजीनगर (संजय क्षिरसागर) -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय आणि डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमेन्स, जुबली पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी कर्करोग जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाला विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल आणि डॉ. ऋषिकेश खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. अरविंद गायकवाड व डॉ. विनू अग्रवाल यांनी कर्करोगाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर निदानाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. विद्या प्रधान, उपप्राचार्य नाझेमा खान, डॉ. मेघा राय आणि प्रा. तन्मय पैठणकर यांची उपस्थिती होती. या व्याख्य...