बंद होणारी परंपरा अखंडित....परळी तालुका मंडप असोसिएशनचा पहिलाच सांस्कृतिक उपक्रम....
परळीत उद्या रंगणार ‘दिवाळी पहाट’; स्वरनक्षत्रच्या सुरांनी नववर्षाचे स्वागत! आ. धनंजय मुंडे आणि नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती परळी वैजनाथ : दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त परळीकरांसाठी यंदा संगीताची खास मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. बीड जिल्हा मंडप असोसिएशन व परळी तालुका मंडप असोसिएशन यांच्या वतीने प्रथमच ‘दिवाळी पहाट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरनक्षत्र प्रस्तुत या कार्यक्रमात परळीतील तसेच निमंत्रित कलाकारांकडून पहाट गाण्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंगमंदिर, परळी वैजनाथ येथे हा कार्यक्रम होणार आहे. दीपावलीच्या उत्सवी वातावरणात सुरेल गीतांची मैफल अनुभवण्याची संधी यानिमित्ताने परळीकरांना मिळणार आहे.या कार्यक्रमाला माजी मंत्री आ. धनंजय मुंडे आणि परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परळी तालुका मंडप असोसिएशनच्या वतीने प्रथमच अशा स्वरूपाचा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात ...