इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-*परळीत साकारणार 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज* *विशालकाय डोंगरावर तिरंगा ध्वज, सेल्फी पॉईंट व उद्यान निर्मिती कामाचे धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन*

  *परळीत साकारणार 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज* 



*विशालकाय डोंगरावर तिरंगा ध्वज, सेल्फी पॉईंट व उद्यान निर्मिती कामाचे धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन*

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

परळी दि। 19 - : परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या विशालकाय डोंगरावर सुमारे 75 लाख रुपये खर्चून 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज साकारणार असून, यासह सेल्फी पॉईंट, उद्यान निर्मिती आदी कामांचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन करण्यात आले. 


धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रभक्तीचे स्फूर्तिस्थळ म्हणून साकारण्यात येत असलेल्या या एकूण कामाचा खर्च 75 लाख रुपये असून, पुणे येथील नामांकित कंपनीच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे. 


या विशालकाय डोंगर माथ्यावर विशाल तिरंगा ध्वजासोबतच, 'आय लव्ह परळी वैद्यनाथ' हा सेल्फी पॉईंट व उद्यान निर्मिती करण्यात येणार असून, डोंगर माथ्यावर उभारले जात असलेले हे उद्यान परळीकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. 

आवर्जून बघा:-🎇 *सरपंच प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण; 30 एप्रिल पासून परळीत डे-नाईट क्रिकेट स्पर्धा- ना.धनंजय मुंडे

या भूमिपूजन समारंभास ना. धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक अण्णा कराड,  बाजीराव भैय्या धर्माधिकारी, कांता फड, भाऊसाहेब कराड, संग्राम गित्ते, अमर गित्ते, सुरेश नानवटे, शंकर कापसे, अमित केंद्रे, अमर रोडे तसेच नगर परिषदेचे प्रशासक डॉ. अरविंद मुंडे, नगर परिषद अभियंता श्री. बेंडले, कंपनीचे अमोल कुटे यांसह आदी उपस्थित होते.

MB NEWS आपल्या हक्काचं व्यासपीठ.
आपल्या सुचेना,काॅमेन्टस्, मार्गदर्शन व पाठबळ प्रार्थनिय.

------------------------------------------------------------

🎇 हे देखील वाचा-

आजचे राशिभविष्य दि.२० फेब्रुवारी २०२२

🔸 *खेळ पैठणीचा व सुंदर माझे अंगण स्पर्धेचे ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण*

💢 *कलेचे कौतुक:चित्रकार मैथिली लोंढे,अथर्व कुलकर्णी तसेच ऋषिकेश सुपेकर यांनी रेखाटली शिवरायांचे मनमोहक चित्रे* 💢

⭕ *धनंजय मुंडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती.*

🏵️ *परळीमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला.

⭕ *धनंजय मुंडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन; शिवजयंती कार्यक्रमांना उपस्थिती.*

🔸 *परळीत साकारणार 'सेवागड़': सोमवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते भूमिपूजन*


आवर्जून बघा:🏵️ *शिवजयंतीला ना.धनंजय मुंडे यांनी केली परळीत महत्त्वपूर्ण घोषणा.*


🏵️ *आवश्य बघा: परळीत शिवजयंतीचा उत्साह,रोशनाई आणि दैदिप्यमान सजावट.*


⭕ *शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम: ना. धनंजय मुंडेच्या उपस्थितीत झाला सामुदायिक मंगल परिणय सोहळा*


🟥 *अध्यात्मिक गौरव: शंकराचार्य पिठाकडून बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर सेलूकर महाराजांना "यज्ञ मार्तंड" उपाधी*


🏵️ *शिवरायांना कलात्मक वंदन:युवा चित्रकाराचे सर्व स्तरातून कौतुक.*


🏵️ दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.






-----------------------------------------------------------
🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑
---------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!