परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून परळीत क्रिडासंकुलाला २० कोटी रु निधी; क्रिडाप्रेमींनी मानले आभार

 कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या माध्यमातून परळीत क्रिडासंकुलाला २० कोटी रु निधी; क्रिडाप्रेमींनी मानले आभार


परळी वैजनाथ...

       छत्रपती संभाजीनगर येथे सपंन झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये  विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला , त्यात परळी क्रीडा संकुल उभारण्यासाठी २० कोटी रु निधी जाहीर झाला 

       परळीचे भाग्यविधाते विकासपुरुष  धनंजय मुंडे  यांनी हा विषय मनात घेऊन मागच्याच वेळी क्रीडा संकुल साठी जागेची पाहणी करण्यासंबंधी सूचना ही केल्या.आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर निधीही मंजूर करून घेतला व परळी क्रीडा प्रेमींना खूप मोठी भेट दिली. मंजूर निधीचे काम लवकरात लवकर सुरू होऊन भव्य असे क्रीडांगण लवकरच उभे राहून  खेळाडूंना योग्य न्याय मिळेल या घोषणे मध्ये क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात आला. असून  ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत .

         राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे  अध्यक्ष अजय जोशी , नवनिर्वाचित क्रिडाध्यक्ष शिवाजी मुंडे शहराध्यक्ष विलास अरगडे , परळी तालुका क्रीडास्पर्धा संयोजक संजय देशमुख क्रीडा शिक्षक बालू हंगरगे , विजय मुंडे , अतुल दुबे , मदन कराड , यशवंत कांबळे , जगदीश कावरे , ओम मेंकुडले , सय्यद अनवर, संजय शेप , प्रा सुनील चव्हाण , रामकृष्ण गडदे रमेश गित्ते व क्रीडा शिक्षक संघटना यांनी  ना.  धनंजय मुंडे  यांचे आभार मानले आहेत.

---------------------------------------------------

Click:■ खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल


Click:■ *तळेगाव-पांगरी दरम्यान आपघात: एक जण जागीच ठार*


Click: ■ *बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धनंजय मुंडेंची 7 कोटी 17 लाखांची अशीही मदत...


Click:● *अमित शहा यांचा उद्याचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द* https://majhibatmi.blogspot.com/2023/09/blog-post_58.html

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!