पोस्ट्स

MB NEWS- *भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर*

इमेज
 भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे सलग तीन दिवस मायबोली या टि व्ही चॅनल वर महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहेत फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या आवडत्या मायबोली या लोकप्रिय मराठी वाहिनीवरून येत्या रविवार पासून सलग तीन दिवस  दि 21 22 आणि 23 मार्च 2021 पर्यंत. थोर किर्तनकार वै. रामेश्वर महाराज गुट्टे परळी वै. यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने राज्यस्तरीय भव्य किर्तन महोत्सव परळी-वैद्यनाथ येथील अखंड हरिनाम सप्ताहातील पाचवे किर्तन पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिध्द युवाकिर्तनकार तथा भागवताचार्य श्री ह.भ.प.जगदीश महाराज सोनवणे यांच्या सुमधूर आवाजात उत्कृष्ट किर्तनसेवा जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील  आपुला तो एक देव करूनी घ्यावा या अंगावरील चिंतनीय किर्तनसेवा जिवनात सुख पाहिजे असेल तर जगात फक्त देव आपलासा करावा लागतो अशा पद्धतीने सोनवणे महाराज यांनी अतिशय मार्मिक चिंतन अभंगातून आपल्या समोर मांडले आहे तरी सर्वांनी या मायबोली वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या किर्तन रंग या मालिकेतील हे ...

MB NEWS-सर्व व्यवसायिकांनी दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाई किंवा संपूर्ण लाॅकडाउन-जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा*

इमेज
  सर्व व्यवसायिकांनी दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाई किंवा संपूर्ण लाॅकडाउन-जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा बीड/प्रतिनिधी..........     जिल्ह्यातील सर्व व्यवसायिकांनी उद्या दि.२०पर्यंत अॅन्टिजेन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे किंवा जिल्ह्यात संपूर्ण लाॅकडाउन करावे लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.       जिल्ह्यातील सर्व व्यापारी व त्यांचे प्रतिनिधी यांनी दिनांक ०१.०३.२०२१ रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकी मध्ये हमी दिली होती की, सर्व व्यापारी १५ मार्च २०२१ पर्यंत अॅन्टीजेन/आरटीपीसीआर टेस्ट करून घेतील, १५ मार्च २०२१ नंतर जो व्यापारी अॅन्टीजन/आरटीपीसीआर टेस्ट न करता आपला व्यवसाय सुरु करेल त्यावर फौजदारी तसेच दंडात्मक कार्यवाही अनुसरावी. तसेच रेस्टॉरंट,बार, भाजीपाला- फळ विक्रेते यांचे प्रतिनीधी यांनी प्रत्यक्ष भेट घेवून सर्व नियम पाळूनच व्यवसाय केले जातील लागू केलेले निर्बध शिथिल करण्यात यावेत अशी विनंती केली होती. त्यानुसार परवानगी देण्यात आली. परंतु प्रशासनाच्या ...

MB NEWS-बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार - पंकजाताई मुंडे

इमेज
बीड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत लोकशाहीचा अवमान ; संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने मतदानावर बहिष्कार - पंकजाताई मुंडे *_कोरम पूर्ण होण्याएवढे उमेदवारच होणार नाहीत ; सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव_* बीड । दिनांक १९। बीड जिल्हा सहकारी बॅकेच्या निवडणूकीत सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा फार मोठा अवमान झाला आहे. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रियाच खोटी असल्याने उद्याच्या मतदानावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असे पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले. तथापि कोरम पूर्ण होतील एवढे उमेदवारच होणार नाहीत असे सांगून सुरळीत चालू असलेल्या बँकेवर प्रशासक आणण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचे त्या म्हणाल्या.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आज सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जे काही प्रकार घडले ते जिल्हयाने पाहिले आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. आम्ही पाच वर्षात बँकेत श...

MB NEWS-शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे

इमेज
शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन–प्रा.टी. पी.मुंडे परळी /प्रतिनिधी महावितरण कंपनीकडून सध्या शहरी आणि ग्रामीण भागात वीज तोडणी मोहीम राबविण्यात येत आहे वाण प्रकल्पावरील तसेच शेतातील कृषिपंपांची वीज तोडणी थांबवा अन्यथा शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा  प्रा. टी. पी.मुंडे (सर) यांनी दिला आहे.    मांडेखेल येथे वाण प्रकल्प व परिसरातील सर्व शेतकरी यांची बैठक  प्रा.टी. पी.मुंडे (सर)यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे आणि नागापूर सर्कलचे जि. प.सदस्य प्रदीप मुंडे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली आणि यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे विधिमंडळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले होते तसेच राज्याचे ऊर्जामंत्री यांनीसुद्धा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडणार नसल्याचे सांगितले होते आणि 100 युनिट पर्यंत विज बिल माफ करू असा निर्णय सरकारने घेतला परंतु यापैकी एकही निर्णय सरकारने पाळला नाही....

MB NEWS-अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला फेलोशिपचा मान

इमेज
  अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला फेलोशिपचा मान परळी/प्रतिनिधी.... इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्सतर्फे देण्यात येणाऱ्या किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय) परीक्षेत परळीचा युवक अमेय गुरुप्रसाद देशपांडे याला राष्ट्रीय पातळीवरील श्रेणी प्राप्त करून फेलोशिप मिळाली आहे. अमेय लातूरमधील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. तर परळीतील प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांचा मुलगा, निवृत्त ज्येष्ठ अधिष्ठाता (डीन) डॉ. जे. जे. देशपांडे यांचा नातू आहे. या यशाबद्दल अमेयचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

MB NEWS -परळीतील विजपुरवठा सुरळीत करा व सक्तीची वसुली थांबवा-भाजयुमोची निवेदनाद्वारे मागणी

इमेज
  परळीतील विजपुरवठा सुरळीत करा व सक्तीची वसुली थांबवा-भाजयुमोची निवेदनाद्वारे मागणी  परळी वैजनाथ /प्रतिनिधी...         गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरात विजेचा लपंडाव सुरू असून ऐन उन्हाळ्यात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वसुलीला सामोरे जावे लागत आहे.वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारीचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.         याबाबत परळी वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता आंबडकर व देशमुख मॅडम यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरातील नागरिक विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. या तक्रारींचा निपटारा अद्याप झालेला नाही. त्यातच सक्तीची वस...

MB NEWS-*प्राचार्या अर्चना नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत मिळवले यश*

इमेज
*प्राचार्या अर्चना नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत मिळवले यश* परळी वै... _प्रतिनिधी_        प्राचार्या अर्चना दिंगबरराव नागरगोजे-गित्ते यांनी पि.एच.डी.पुर्व परीक्षेत यश यांनी  संपादण केले आहे.मधुकर गित्ते यांच्या सौभाग्यवती त्या परळी येथील यशवंतराव चव्हाण या महाविद्यालयत प्राचर्या  या पदावर कार्यरत असुन सौ.अर्चना यांच्या या उज्वल यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येवुन पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा देण्यात येत आहेत..