– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....
काय असतो मुहर्रमचा आशुरा? – नौशाद उस्मान सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही. मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे. मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...