पोस्ट्स

शरदचंद्र पवार यांचा राजेभाऊ फड यांना ऊर्जादायी शब्द

इमेज
  राजेभाऊ तू काळजी करू नको, मी आहे.... शरदचंद्र पवार यांचा राजेभाऊ फड यांना ऊर्जादायी शब्द परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ परळी वैजनाथ येथे भव्य जाहीर सभा घेतली. परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेने या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारच्या सुमारास त्यांचं परळीत आगमन झालं. यावेळी युवक नेते राजेभाऊ फड यांनी हेलिपॅडवर उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. यावेळी शरदचंद्र पवार यांनी राजेभाऊ फड यांचा हात पकडत म्हटले की, "राजेभाऊ तू संघर्ष करत रहा, काळजी करू नकोस मी आहे..." असा विश्वास दिला. देशाचे नेते, जाणते राजे शरदचंद्र पवार महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ परळी वैजनाथ शहरात आले होते. त्यांचे युवक नेते राजेभाऊ फड यांनी स्वतः हेलिपॅडवर उपस्थित राहून प्रभू वैद्यनाथ यांच्या पावन भूमीत स्वागत केले. यावेळी पवार साहेबांनी थोड्याच शब्दांत मोठी ऊर्जा दिली आणि मार्गदर्शन केले. ते मला म्हणाले... "राजेभाऊ तुमच्यासारख्या तरुण तडफदार नेतृत्वाची आजच्या समाजाला गरज

समन्वयाचा आभाव.....राजेसाहेबांना भोवणार!

इमेज
शरद पवारांच्या सभेआधीच परळीच्या महाविकास आघाडीतील  बेबनाव चव्हाटय़ावर ! शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचाच फोटो नाही :विचारत न घेताच टाकले शिवसेना(उबाठा) पदाधिकाऱ्यांचे फोटो परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची परळी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. परळी मतदारसंघात महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.याच अनुषंगाने आता महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही सगळा आवमेळ असल्याचे दिसून येत आहे. नेमकं शरद पवार सभेला येण्याआधीच परळीच्या महाविकास आघाडीतील बेबनावर चव्हाटय़ावर आल्याचे दिसून येत आहे.        परळी वैजनाथ येथे आज दि. नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मोंढा मार्केट येथे शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अगोदरच ताळमेळ नाही. यातच शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांची सभा या मतदारसंघाला मिळाली मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मोट बांधण्यात समन्वयाचा मोठा अभाव असल्याचे दिसून येते

MB NEWS:सर्वोच्च नेत्याची सभा मिळाली पण..........

इमेज
महाविकास आघाडीत समन्वयच नाही:राजेसाहेबांना परळीत काही जणांची 'हलगर्जी बहादुरकी'भोवणार! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघात अगोदरच अनेक जणांना उमेदवारीच्या रांगेत झुलवत ठेवून परळी तालुक्यातील सर्वच इच्छुक उमेदवारांना टाळत अंबाजोगाई तालुक्यातील राजसाहेब देशमुख यांना शरद पवार यांनी परळी मतदारसंघाची उमेदवारी दिली. राजेसाहेब देशमुख यांचा संपूर्ण बीड जिल्ह्यात संपर्क जरी असला तरी निवडणुकीसाठी त्या त्या शहरांमध्ये प्रॉपर यंत्रणा असणे आवश्यक असते. सद्यस्थितीला परळी शहरात राजेसाहेब देशमुख यांना व्यक्तिशः प्रतिसाद मिळत असला तरी त्यांची प्रॉपर यंत्रणा मात्र महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावाने  दिसून येत नाही. त्यातच ज्यांना जबाबदारी दिली त्या काही जणांच्या 'हलगर्जी बहादूरकी' करण्याच्या पद्धतीने राजेसाहेबांना ही बाब येणाऱ्या काळात अडचणीची ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.             राज्याचे विद्यमान कृषिमंत्री धनंजय मुंडे व मुंडे परिवाराचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परळी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँ

परळीत सभा : फुलचंद कराड यांनी केलं हे आवाहन

इमेज
शरदचंद्र पवार यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा-फुलचंद कराड परळी वैजनाथ(प्रतिनिधी)  परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या प्रचारा निमित्त परळी शहरात होत असलेल्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार  हे मार्गदर्शन करणार असून या सभेला उपस्थित राहून परळी मतदारसंघातील परिवर्तनाच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केले आहे.  परळी येथील मोंढा मैदानावर शनिवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता खासदार शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा होणार असून ही सभा परळी विधानसभा मतदारसंघाचा प्रत्यक्षात विकास करण्याची नांदी ठरणार आहे या सभेत महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार असून परळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मोंढा मैदानावरील या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन फुलचंद  कराड यांनी केले आहे

महेशदादा लांडगे विजयाची हॅटट्रिक नक्की करतील

इमेज
आ. पंकजा मुंडेंनी भोसरीची सभा धडाकेबाज भाषणाने गाजवली महायुती सरकारचा विकास प्रत्यक्ष दिसणारा ; आघाडीने मात्र जनतेला झुलवत ठेवले  महेशदादा लांडगे विजयाची हॅटट्रिक नक्की करतील भोसरी (पुणे) ।दिनांक ०७। राज्यातील भाजपा महायुती सरकारने केलेला विकास 'हा सूर्य, हा जयद्रथ' असा प्रत्यक्ष समोरासमोर दिसणारा आहे. महाविकास आघाडीने मात्र जनतेला केवळ झुलवत ठेवण्याचे काम केले, त्यामुळे या निवडणुकीत भाजपा महायुतीलाच आपली पसंती देऊन पुन्हा एकदा सत्तेवर आणा असं आवाहन  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी केले. ही सभा पंकजाताईंनी आपल्या धडाकेबाज आणि आक्रमक भाषणाने गाजवली. सभेला त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विराट जनसमुदाय उपस्थित होता. भोसरी (पुणे) विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार महेश दादा लांडगे यांच्या प्रचारार्थ दिघी येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर उमेदवार महेश दादा लांडगे, आ. उमाताई खापरे, आ. अमित गोरखे, सदाशिव खाडे तसेच भाजपा महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीकडे कोणताही मुद्दा, संकल्प राहिलेला नाही. लोकांना केवळ झुलविण्याचे काम त्यांनी

मंत्री असताना महिलांसाठी अनेक योजना राबविल्या

इमेज
शिरोळेंच्या वतनात, आ. पंकजाताई मैदानात! सिध्दार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ पुण्यात आ. पंकजाताई मुंडेंचा महिला मेळावा स्त्रियांना सन्मान व सुरक्षा देणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेत आणा पुणे ।दिनांक ०६। राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सरकारने स्त्रियांना सन्मान व सुरक्षा देण्याचे काम केले. लाडकी बहिण सारखी योजना राबवून आत्मविश्वास निर्माण केला त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत आणण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. एक संस्कारी चेहरा असलेल्या सिध्दार्थ शिरोळे यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी येथे केले. शिवाजीनगर (पुणे) विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार सिध्दार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ बुधवारी आ. पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी सुजाता शिरोळे, वर्षा डहाळे, हर्षदा फरांदे, श्रध्दा शिंदे, लावण्या शिंदे, भावना शेळके, सुवर्णा त्रिगुणाईत आदींसह महायुतीच्या महिला पदाधिकारी मोठ्य

शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास दुसर्या दिवशी भाविकांची गर्दी

इमेज
  आत्मलिंगाची अनुभुती हेच शिवमहापुराण कथेचे सार -प.पु.कनकेश्वरी देवीजी शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास दुसर्या दिवशी भाविकांची गर्दी परळी (प्रतिनिधी)  शिवकथा ही मनुष्याला त्याग करायला शिकवते.शिवमहापुराण आत्मलिंगाची अनुभुती देते आणि हेच शिवमहापुराण कथेचे सार असल्याचे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींनी केले.परळी येथील हालगे गार्डन येथे येथे महाशिवपुराण ज्ञानयज्ञात दुसरे पुष्प गुंफताना बोलत होत्या.  परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात गुरुवार दि.७ नोव्हेंबर रोजी माता कनकेश्वरी देवीजी कथेचे दुसरे पुष्प आपल्या सुमधुर वाणीतुन व संगीताच्या साथीने गुंफताना माता कनकेश्वरी देवीजी यांनी शिवमहापुराण कथेचे महत्व सांगताना आधुनिक काळात जीवन जगत असताना दान देणारा व दान स्विकारणारा कसा असावा यावर सविस्तर विमोचन केले.शरीर आत्म्याचा आधार नसुन आत्मा शरीराचा आधार आहे.हे जेव्हा समजेल तेव्हा शिवालयात प्रवेश झाला असे समजावे.परंतु आपण शरीरालाच आधार समजतो.ज्याला ही गोष्ट समजली