महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी बहुमताने निवडून येणार- फुलचंद कराड फुलचंदराव कराड महायुतीत आल्याने महायुतीला बळ मिळाले- माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी परळी वैजनाथ दि. २९ (प्रतिनिधी) महायुतीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी बहुमताने निवडून येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक फुलचंदराव कराड यांनी केले. तर फुलचंदराव कराड महायुतीत आल्याने महायुतीला बळ मिळाल्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी म्हणाले. ते शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक फुलचंदराव कराड यांच्या संपर्क कार्यालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत होते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते फुलचंदराव कराड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर त्यांना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबद्दल कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयात फुलचंदराव कराड यांच्...