शरद पवार म्हणाले, कोण आहेत हे नरेश अरोरा ?
अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अचानकपणे चर्चेत आलेले कोण आहेत नरेश अरोरा? अ जित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली जात असतानाच शुक्रवारी (30 जानेवारी) दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलं.30 जानेवारीला दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक घडामोडी घडल्या. पक्षातील नेत्यांच्या बैठका झाल्या. उपमुख्यमंत्रिपदी कोणाची नेमणूक करायची याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील, असं सांगण्यात येऊ लागलं.याच दरम्यान निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा हेही बारामती येथे पोहोचले. त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचे काही माध्यमांनी सांगितलं. या भेटीनंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील अशा बातम्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. हा निर्णय घेण्यात अरोरा यांची भूमिका काय होती हे कालांतराने स्पष्ट होईल. परंतु, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय घडामोडीत ते चर्चेचा विषय ठरले आहेत. कोण आहेत हे नरेश अरोरा ? नरेश अरोरा हे डिझ...