पोस्ट्स

ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती..

इमेज
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा ना.पंकजाताई मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश ; नुकसानीची घेतली माहिती बीड दि. २० --- जिल्हयात काल आणि परवा गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.     अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची ना. पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाकडून सर्व माहिती घेतली. बीड, वडवणी, आष्टीसह अन्य तालुक्यालाही कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. आंबा, टरबूज, मोसंबी या फळबागांचे तर गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मळणीसाठी काढून ठेवलेली पिके भिजल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश देऊन शासनाच्या संबंधित विभागाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे ...

नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा

इमेज
परळीत २२ एप्रिल रोजी ब्राह्मण बहुद्देशीय सभेचा सामुदायिक  उपनयन संस्कार सोहळा! नावनोंदणीसाठी संपर्क साधावा – ब्राह्मण सभा परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-     ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने यावर्षी ४६ वा सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळा येत्या २२ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात नियोजनबध्द सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळ्यात आपल्या मुलांचा उपनयनसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने करण्यात आले आहे.    गेल्या ४५ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन  संस्कार सोहळा बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी वैद्यनाथ मंदिर दर्शन मंडप परळी वै. येथे सकाळी ८.५२ वा. संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी २१०० रु...

ना.पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण व शुभारंभ...

इमेज
प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत परळीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ६७७ घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता होणार प्रदान रमाई घरकुल आवास योजनेच्या नवीन मंजूर दोनशे प्रस्तावांचा शुभारंभ आणि 546 दिव्यांगांना सहाय्यता निधीचे  वितरण  ना.पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण व शुभारंभ परळी वैजनाथ | प्रतिनिधी...        प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत परळी शहरातील तब्बल 677 लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. सर्वांसाठी निवारा हे उद्दिष्ट घेऊन प्रत्येकाच्या डोक्यावर हक्काचे छत असावे या दृष्टिकोनातून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून 677 लाभार्थ्यांना ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याच्या दिवशी दि. 19 रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रमाई घरकुल आवास योजनेच्या नवीन मंजूर दोनशे प्रस्तावांचा शुभारंभ आणि 546 दिव्यांगांना सहाय्यता निधीचे  वितरण केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे. ...

विविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा

इमेज
19 कोटी रुपयांचे  टेंडर रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू  विविध पक्ष , संघटनांचा व नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा    परळी (प्रतिनिधी)...     परळी वैजनाथ शहरात यापूर्वी नगरोत्थान सुवर्ण जयंती शहरी विकास योजना अंतर्गत 110 कोटी रुपयांची अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करणा- या लातूर येथील श्रीनाथ इंजिनियर यांना  डी.पी.डी.सी.2025-2026 अंतर्गत 19 कोटी रुपयांची विविध विकास कामांचे दिलेले टेंडर त्वरित रदद करावे यावे व संबंधित एजन्सी ला ब्लॅकलिस्ट करावे या मागणीसाठी  नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करण्यात आले.या उपोषणाला विविध पक्ष व संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा दिला.         श्रीनाथ इंजिनियर लातूर यांनी यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत असलेली 110 कोटी रुपयांची कामे पूर्ण केलेली नाहीत .शहरातील भुयारी गटाराचे चेंबर अनेक ठिकाणी रस्त्यावर उंच तर काही ठिकाणी खोल असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक नागरिकांना अपघातात गंभीर दुखापती झाल्या आहेत.विविध पक्ष व संघटना आणि नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आ...
इमेज
  स्वयंसेवी वैद्यकीय सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सीएमई क्रेडिट गुण प्रणाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून पारदर्शक व सर्वसमावेशक निर्णय मुंबई, दि. 16: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या स्वयंसेवी सेवेचा सन्मान आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC) सातत्याने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहे.  याच अनुषंगाने स्वयंसेवी सेवेकरिता CME (Continuing Medical Education) क्रेडिट गुण प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी स्पष्ट व पारदर्शक धोरण राबविण्यात येत आहे.  स्वयंसेवी सेवेसाठी सीएमई (CME) क्रेडिट गुण देण्याबाबत  सखोल विचार करून परिषदेकडून सध्या अंमलात असलेल्या प्रणालीची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त असलेल्या संघटना, संस्था, अध्यापन संस्था तसेच वैद्यकीय महाविद्यालयांना ठराविक निकष व मार्गदर्शक तत्वांनुसार CME क्रेडिट गुण प्रदान...

राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार

इमेज
  कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य शासन व वाधवानी एआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि. 16 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आधारित आधुनिक उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी राज्य शासन आणि वाधवानी एआय (LEHS AI Unit) या सामाजिक हेतूने कार्य करणाऱ्या ना-नफा-ना-तोटा संस्थेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या सामंजस्य कराराअंतर्गत क्षयरोग (TB), मातृ, नवजात व बाल आरोग्य (MNCH), प्राथमिक आरोग्य सेवा, ई-हेल्थ आदी क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा समावेश करून आरोग्य सेवांचा दर्जा अधिक उंचावण्यात येणार आहे. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार, वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा पोहोचवणे हा या भागीदारीच...
इमेज
  राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळया रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर नवी दिल्ली, 16 मार्च  : साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून मराठी भाषेतील ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेसाठी लेखक राजू बाविस्कर यांना  पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमी ही भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त राष्ट्रीय संस्था असून भारतीय भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. दरवर्षी अकादमीकडून विविध भाषांतील उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करून त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथेत लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवास यांचे प्रभावी चित्रण केले आहे. या साहित्यकृतीला मिळालेल्या  पुरस्कारामुळे मराठी साहित्यविश्वाचा गौरव वाढला आहे. यंदाच्या ...