प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४ अंतर्गत निधी मंजूर; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
खा.बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नांना मोठे यश गेवराई तालुक्यातील 'एमडीआर-२० ते यमगरवाडी' रस्ता कामाला मंजुरी! प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४ अंतर्गत निधी मंजूर; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण बीड: गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा आणि दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तालुकयातील L021 एमडीआर-२० ते यमगरवाडी या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-४' (PMGSY-IV) अंतर्गत प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. बीडचे खा. बजरंग सोनवणे यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांना यामुळे मोठे यश आले असून, या रस्त्यासाठी १ कोटी ३७ लक्ष २९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने (नवी दिल्ली) १८ मे २०२६ रोजी या कामाला अधिकृत मंजुरी दिली असून, यामुळे परिसरातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी अडचण दूर होणार आहे. गेवराई तालुक्यातील एमडीआर-२० ते यमगरवाडी...