७१८ खातेदारांना २ कोटी ९० लाखांचे कर्जवाटप
सहूलत पतसंस्थेची वार्षिक सभा; व्याजमुक्त व्यवस्थेचा आग्रह १३ कोटी ६८ लाखांची उलाढाल; ७१८ खातेदारांना २ कोटी ९० लाखांचे कर्जवाटप परळी वैजनाथ : येथील सहूलत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि स्वागत समारंभ उत्साहात झाला. संस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १३ कोटी ६८ लाख १७ हजार ३५ रुपयांची वार्षिक उलाढाल केल्याची माहिती सभेत देण्यात आली. व्याजमुक्त अर्थात ‘बिला-सूद’ आर्थिक व्यवस्थेला अधिक व्यापक स्वरूप देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी विचारवंत मुफ्ती सय्यद अशफाक कासमी होते. संस्थेचे चेअरमन सय्यद अनवर जाफर, सचिव जाफर खान, उपाध्यक्ष शेख जमील, विचारवंत मुफ्ती तैमूर मिल्ली आणि व्यवस्थापक शेख सिराज यांची प्रमुख उपस्थिती होती. सय्यद तजम्मुल अफान यांनी कुराण पठण व सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शेख जमील यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल व ताळेबंद सादर केला. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी असल्याचे त्यांनी सांगितले. शेअर भांडवलाच्या ३,७५७ खात्यांमध्ये १ कोटी ७ लाख ७२ हजार ५०० रुपये, तर डेली अकाउंटच्या ३,८०० खात्...