पोस्ट्स

आधीच दुष्काळ त्यात शासकीय प्रक्रियेचे चटके...विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा खर्च भागविण्याचे आव्हान

इमेज
दुष्काळात विद्यार्थ्यांनाही झळा; निम्मे सत्र संपले तरी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेबाबत अनिश्चितता! परळी वैजनाथ, दि. २८ (प्रतिनिधी) : सध्या मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शैक्षणिक वर्षाचे जवळपास निम्मे सत्र संपत आले असतानाही संबंधित शिष्यवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेबाबत स्पष्टता नसल्याने हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी शिष्यवृत्तीवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना ही मदत नेमकी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठवाड्यातील अनेक कुटुंबांचे अर्थकारण शेती आणि शेतमजुरीवर अवलंबून आहे. पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यांमुळे या कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके, प्रवास आणि वसतिगृहाचा खर्च भागविणे पालकांसाठी कठीण ठरत आहे. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक आधार मिळतो. मात्र, अर्ज प्रक्रिया सुरू होण्याबाबतच अनिश्चि...
इमेज
राख विक्रीच्या वादावर तोडगा काढण्याचे मुख्य अभियंत्याचे आश्वासन; महिलांचे आंदोलन तूर्त स्थगित परळी वैजनाथ, प्रतिनिधी :         परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राख वितरणातील जातीय भेदभावावरून दाऊतपुर येथील काही महिलांनी काल(दि.२७) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिवसभर मुख्या अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. रात्री उशिरा या आंदोलनावर तोडगा निघाला आहे. .परळी औष्णिक विद्युत केंद्रातील राख विक्रीच्या आदेशांच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेल्या वादात प्रशासनाने लेखी पत्र दिल्यानंतर महिलांनी आपले आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. राख उचलण्याच्या प्रक्रियेसंदर्भात संबंधितांना सूचना देत पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.          महाजनकोच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रामार्फत राख विक्रीसाठी मंजूर आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्यांनी आंदोलन सुरू केले होते. या प्रकरणी राख विक्रीचे सेल ऑर्डर क्रमांक ०५२११ व ०५२१२ जारी होऊनही प्रत्यक्ष राख उचलण्याची प्रक्रिया सुरू नसल...

सर्व स्तरातून अभिनंदन.....

इमेज
जि.प. शाळा इंदपवाडीचा सुपुत्र आदित्य मुंडे याची इस्त्रो-नासा सहलीसाठी जिल्हा  स्तरावरील परीक्षेसाठी निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी): इस्त्रो (ISRO) आणि नासा (NASA) सहलीसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंदपवाडी येथील विद्यार्थी चि. आदित्य मनीषा अनंत मुंडे याने यश संपादन करत जिल्हास्तरावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. या  यशाबद्दल शाळेच्या वतीने आदित्यचा सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मिळवलेले हे यश संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद असल्याने शाळेत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावच्या सरपंच सौ. शालूताई फुलचंदराव मुंडे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. केशवराव मुंडे, गावच्या पोलीस पाटील तथा आदित्यची आई सौ. मनीषा अनंत मुंडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुभाष केंद्रे आणि सर्व शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवर आणि गुरुजनांच्या हस्ते आदित्यचा सत्कार करण्यात आला. एका सामान्य कुटुंबातून आणि जि. प. शाळेतून शिक्षण घेत आदित्यने मारलेली ही गरुडझेप इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रे...

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याससह वरिष्ठ नेत्यांकडून सांत्वन...

इमेज
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना मातृशोक; शिवकांताबाई गुट्टे यांचे निधन राजकीय,सामाजिक क्षेत्रासह सर्व स्तरातून शोकसंवेदना परळी वैजनाथ : प्रतिनिधी....       शिवसेनेच्या नेत्या तथा प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या मातोश्री शिवकांताबाई दत्तराव गुट्टे (वय ७५) यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. मंगळवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी नंदनज (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने अंधारे-गुट्टे कुटुंबावर शोककळा पसरली असून, विविध पक्षांच्या नेत्यांनी दूरध्वनीवरून शोकसंवेदना व्यक्त केल्या.        दिवंगत शिवकांताबाई या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ज्येष्ठ व विश्वासू सहकारी दत्तराव गुट्टे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात धनराज, विशाल, रविराज, राम, ऋक्षराज ही पाच मुले, सुषमा अंधारे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत शिवकांताबाई या अतिशय मनमिळाऊ, कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाने  गुट्टे कुटुंबाचा आधारवड कोसळला आहे. नंदनज ता. परळी वैजनाथ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्य...

परळीत रंगतदार निमंत्रित कविसंमेलन ....

इमेज
‘कविता रंगते कोजागिरी’तून सामाजिक भान, माणुसकी आणि जगण्याचे कवित्व ! स्त्रीसंघर्षापासून दुष्काळाच्या वेदनेपर्यंत; निमंत्रितांच्या कविसंमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परळी वैजनाथ, दि. २७ (प्रतिनिधी) :  स्त्रीच्या अस्तित्वाचा हुंकार, शेतकरी बापाच्या घामाची कहाणी, दुष्काळाच्या वेदना, नात्यांतील संवेदनशीलता आणि परिवर्तनाची आस... शब्दांतून उमटलेल्या या जगण्याच्या अस्सल लयींनी ‘कविता रंगते कोजागिरी’ची मैफल अविस्मरणीय ठरली. मराठवाडा साहित्य परिषद आणि समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित निमंत्रितांच्या या कविसंमेलनात कवींनी सामाजिक वास्तवाचे पदर उलगडत रसिकांना कधी अंतर्मुख केले, कधी भावविवश केले, तर कधी हास्याच्या कारंज्यांत चिंब भिजवले. परळीतील माणिकनगर येथील कल्याणकारी हनुमान मंदिराच्या प्रांगणात रंगलेल्या या चार तासांच्या काव्यमैफलीत कविता केवळ सादर झाली नाही, तर ती जगण्याच्या वेदनांना आवाज देत आणि माणुसकीची जाणीव जागवत रसिकांच्या मनामनांत उतरली.        स्त्रीच्या संघर्षाला आत्मभानाची ज...

परळीतील चोरीचा बीड एलसीबीकडून उलगडा..

इमेज
  परळीत घडलेला प्रकार: नाशिकमधून आरोपीला अटक चमत्कार दाखविण्याच्या बहाण्याने वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास  परळी वैजनाथ : दगडाच्या खड्यापासून रुद्राक्ष बनविण्याचा चमत्कार दाखविण्याच्या बहाण्याने एका वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले. अफजल नवाब मदारी (वय २५, रा. लक्कडकोट, सध्या सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून चोरीची अंगठी हस्तगत करण्यात आली आहे. २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास हेळंब (ता. परळी) येथील गणपत लक्ष्मण आंधळे हे परळी बसस्थानकात उभे होते. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातात दगडाचा खडा देऊन त्यापासून रुद्राक्ष बनविण्याचा चमत्कार दाखविण्याचा बहाणा केला. या दरम्यान, संबंधित व्यक्तीने आंधळे यांच्या हातातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चलाखीने काढून घेतली आणि तेथून पळ काढला. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ह...

परळी रेल्वे विकास समितीचे डीआरएमना निवेदन

इमेज
दिवाळीसाठी पुणे-मुंबईहून परळीमार्गे नांदेडला विशेष रेल्वे गाड्या सोडा! प्रवाशांची वाढती गर्दी आणि खासगी वाहतुकीच्या वाढीव दरांकडे लक्ष वेधत परळी रेल्वे विकास समितीचे डीआरएमना निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी....     दिवाळी सणासाठी पुणे आणि मुंबई येथून मराठवाड्यातील आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे व मुंबई येथून परळी वैजनाथमार्गे नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी परळी रेल्वे विकास समितीने केली आहे. दोन्ही मार्गांवर जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी दोन विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या मंडल रेल्वे व्यवस्थापकांकडे (डीआरएम) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुणे आणि मुंबई येथे शिक्षण, नोकरी तसेच व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या परळी वैजनाथसह मराठवाड्यातील अनेक नागरिक दिवाळीनिमित्त गावी परततात. त्यामुळे सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. सध्या नियमित रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी असून, अनेक गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतही वाढ झाली आहे. परिणामी, प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळविण्यासाठी अडचणी...