पोस्ट्स

मुरूम, डस्ट टाकून रस्ता तातडीने चिखलमुक्त करण्याची मागणी

इमेज
पावसामुळे अंबेवेस पुलाचा पर्यायी रस्ता चिखलमय; वैद्यनाथ दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय ! मुरूम, डस्ट टाकून रस्ता तातडीने चिखलमुक्त करण्याची मागणी परळी वैजनाथ : प्रतिनिधी       आंबेवेस परिसरातील सरस्वती नदीवरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून, प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्यावर तातडीने मुरूम व डस्ट टाकून तो चिखलमुक्त करावा, अशी मागणी नागरिक आणि भाविकांकडून होत आहे.        या पर्यायी रस्त्याची दुरवस्था गुरुवारी समोर आली. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा चिखलामुळे तोल जाऊन पडल्याची घटना घडली. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नसली तरी या घटनेमुळे रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या पावसाळा सुरू असून, आगामी श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविक गावभागातून याच मार्गाचा वापर करतात. तसेच गुलाब महाराज पालखीसह विविध पालख्या याच मार्गाने जात असल्याने या र...
इमेज
  एटीएम फोडून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न हाणून पाडला; २४ तासांत तिघांना अटक अंबाजोगाई, प्रतिनिधी : शहरातील बस डेपोजवळील अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघा सराईत आरोपींना अंबाजोगाई पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले असून, अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ३ जुलै रोजी पहाटे सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी बस डेपोजवळील एसबीआयचे एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा सायरन ऐकताच आरोपींनी रोकड न घेता घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी केली. त्यामध्ये संशयित वाहन परळीच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. परळी शहर पोलिसांच्या मदतीने वाहनावरील सांकेतिक चिन्हाच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर आरोपी परभणी जिल्ह्याकडे गेल्याची माहिती मिळताच स्थानिक...

संतापाच्या भरात उच्चारलेले एक वाक्य न्यायालयीन निर्णयात किती महत्त्वाचे ठरू शकते ?

इमेज
एका वाक्याने बदलला खटल्याचा निकाल; पत्नीच्या वक्तव्यामुळे जन्मठेपेची शिक्षा कमी होऊन झाली केवळ ७ वर्षांची !      एखाद्या व्यक्तीने संतापाच्या भरात उच्चारलेले एक वाक्य न्यायालयीन निर्णयात किती महत्त्वाचे ठरू शकते, याचे उदाहरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या एका निर्णयातून समोर आले आहे. पत्नीने वादाच्या वेळी 'मी तुझ्यासारखे हजार नवरे पाळू शकते,' असे म्हटल्याने संतप्त होऊन तिची हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कमी करून ७ वर्षे सश्रम कारावासाची केली आहे. हे वक्तव्य आरोपीसाठी 'तात्कालिक आणि गंभीर चिथावणी' ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती विवेक अग्रवाल आणि न्यायमूर्ती अवनेंद्र कुमार सिंग यांच्या खंडपीठाने १८ जून रोजी हा निर्णय दिला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, पत्नीचे वक्तव्य हे पतीच्या स्वाभिमानाला धक्का देणारे आणि त्याचे मूल्य शून्य असल्याचे सूचित करणारे होते. त्यामुळे आरोपीने क्षणिक आवेशात स्वतःवरील ताबा गमावला. या घटनेत हत्या करण्याचा पूर्वनियोजित हेतू आढळून येत नसल्याने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स...
इमेज
महिला महाविद्यालयात स्वामी विवेकानंद पुण्यतिथी साजरी  परळी वैजनाथ,प्रतिनिधी     येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आज दि . ४. ७ . २६ रोजी स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी राष्ट्रीय सेवा योजना विभागद्वारा साजरी करण्यात आली .     आरंभी संस्थेचे अध्यक्ष मा संजय देशमुख , कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी रासेयो विभागाचे डॉ . पी .व्ही गुट्टे सरानी स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला .       या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका सौ छायाताई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्यासह प्रा डॉ . अरुण चव्हाण डॉ राजश्री कल्याणकर . डॉ विलास देशपांडे डॉ राजकुमार यल्लावाड डॉ . रंजना शहाणे डॉ . विद्या गुळभिले डॉ. वाघमारे सर  डॉ जोशी सर, प्रा डॉ संगिता कचरे आदि मान्यवरांची उपस्थिती होती .
इमेज
पैलवान सुमित भारस्कर एशियन चॅम्पियन : बीडच्या मल्लांने गाजवले थायलंडचे मैदान  माजलगाव्र तिनिधी) युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यांच्या वतीने पटाया थायलंड येथे ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा सुरू आहे. भारतीय कुस्ती संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत असलेला महाराष्ट्रातील पैलवान सुमित आप्पासाहेब भारस्कर याने 70 किलो वजन गटामध्ये (फ्रिस्टाईल) सुवर्णपदक प्राप्त केले आहे.       सुमित, रुस्तम ए हिंद व महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती अकादमी मारुंजी जिल्हा पुणे येथे ६ वर्षांपासून सराव करत आहे. पटाया थायलंड येथील सुरू असलेल्या स्पर्धेत सुमित 70 किलो वजन गटामध्ये भारतीय कुस्ती संघात निवड होऊन देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. सुमितची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 'मिशन लक्ष्यवेध' (Mission Lakshyavedh) अंतर्गत हाय परफॉर्मन्स सेंटर्स (High Performance Centres) सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, आहार आणि आधु...

पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून दूरध्वनीवरून साधला संवाद

इमेज
  राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे घेतले दर्शन पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून दूरध्वनीवरून साधला संवाद परळी वैजनाथ, प्रतिनिधी :      राजमाता श्रीमंत कल्पनाराजे भोसले यांनी गोपीनाथ गड येथे भेट देऊन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करून लोकनेते मुंडे यांच्या कार्याला अभिवादन केले.        राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या स्वागतासाठी स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे त्या प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र, त्यांनी दूरध्वनीवरून राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्याशी संवाद साधून त्यांच्या गोपीनाथ गड भेटीबाबत आनंद व्यक्त केला तसेच शुभेच्छाही दिल्या. या प्रसंगी उपस्थितांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे स्वागत केले. ना.पंकजाताईंनी साधला फोनवरून संवाद    ना. पंकजाताई मुंडे हया नवी दिल्लीत असल्याने त्यांनी...
इमेज
व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवत सुनेत्रा पवार वारकऱ्यांच्या पंगतीत पंढरपूर, : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या साधेपणाची आणि वारकरी परंपरेप्रती असलेल्या आदराची प्रचिती घडवली. पंढरपुरातील नव्याने उभारण्यात आलेल्या वारकरी भक्त निवासाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल न स्वीकारता थेट सामान्य वारकऱ्यांच्या पंगतीत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या अनपेक्षित आणि साध्या कृतीने उपस्थित वारकरी, नागरिक आणि मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटन समारंभानंतर स्वतंत्र भोजन व्यवस्था उपलब्ध असतानाही सुनेत्रा पवार यांनी ती नाकारत वारकऱ्यांमध्येच स्थान घेतले. इतर भाविकांप्रमाणेच त्या पंगतीत बसल्या आणि सर्वांसोबत प्रसादाचे जेवण केले. या वेळी कोणताही विशेष लवाजमा किंवा वेगळी व्यवस्था न ठेवता त्यांनी वारकरी परंपरेचा सन्मान राखत सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेजारी बसलेल्या अनेक वारकऱ्यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. काहींनी वारीतील अनुभव सांगितले, तर काहींनी शासनाकडून मिळणाऱ्या ...