पोस्ट्स

Motivational video: पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रेरक कार्यशैली

इमेज
'देश हाच परिवार'... पंतप्रधान मोदींच्या देशाला समर्पित कार्यशैलीचा जवळून घेतलेला अनुभव पंकजा मुंडेंचा भावनिक व्हिडिओ चर्चेत परळी वैजनाथ, प्रतिनिधी :        नेतृत्व म्हणजे केवळ निर्णय घेणे नव्हे, तर स्वतःला एका मोठ्या ध्येयासाठी पूर्णपणे वाहून घेणे," अशी भावना व्यक्त करत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धती विषयीचा एक अनुभव मांडला आहे. दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रत्यक्ष आलेला हा अनुभव त्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे शेअर केला असून, त्यात मोदी यांची कामावरील निष्ठा, राष्ट्रप्रथमचा दृष्टिकोन आणि अविरत कार्यक्षमतेचा उल्लेख केला आहे.      पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी त्या दोन-तीन दिवस दिल्लीत होत्या. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा अधिकृत दौरा पूर्ण करून थेट बैठकीला दाखल झाले. प्रवासाचा थकवा बाजूला सारत त्यांनी प्रत्येक मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला. स्थानिक प्रश्न, संघटनात्मक बाबी आणि विकासाशी संबंधित ...

जाणीवपूर्वक खोडसाळ बातम्या लावणारांना केलं आवाहन....

इमेज
'खोट्या बातम्या पसरवू नका; सामाजिक सलोखा जपा' : धनंजय मुंडेंचे माध्यमांना आवाहन परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :     बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर समाजमाध्यमांवर आणि काही माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तांवर माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार पत्रकारिता करण्याचे आवाहन केले आहे. कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी त्याची शहानिशा करावी आणि चुकीच्या बातम्यांमुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून, बैठकीदरम्यान विरोधी पक्षातील कोणत्याही लोकप्रतिनिधीशी आपला वाद किंवा खडाजंगी झालेली नाही. राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी परस्परांमध्ये संवाद आणि सौहार्द कायम असते. मात्र काही माध्यमांनी वस्तुस्थिती पडताळून न पाहता चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रथमच बीडमध्ये आल्या असताना मोठ्या गर्दीत नागरिकांना शांतपणे आणि हळू...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारंभ...

इमेज
ना. पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते पत्रकार महादेव गित्ते यांचा विशेष गौरव परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या सार्वजनिक जयंती महोत्सवानिमित्त साठेनगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार महादेव गित्ते यांचा विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परळी वैजनाथ येथील साठेनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या जयंती महोत्सवात प्रारंभी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार महादेव गित्ते यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महादेव गित्ते हे गेल्या अनेक वर्षांपासून निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि जनहिताची पत्रकारिता करत आहेत. सामाजिक, शैक्षणि...
इमेज
पावसाळा आला की शिक्षणावर पडते पाणी नाहीतर जीव धोक्यात घालून शाळेची वाट ! विद्यार्थ्यांचा थरारक प्रवास, पुलाअभावी शिक्षणच धोक्यात परळी वैजनाथ | प्रतिनिधी..      शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे असे शासन वारंवार सांगते. मात्र परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथील आरसुळे वस्तीवरील विद्यार्थ्यांचे वास्तव या दाव्याला छेद देणारे आहे. पाऊस सुरू झाला की या चिमुकल्यांच्या शिक्षणावर अक्षरशः पाणी पडते. शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना चिखल तुडवत किंवा पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.     गाढेपिंपळगाव आणि आरसुळे वस्तीच्या दरम्यान पापनाशी नदी वाहते. सुमारे पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नदीपलीकडे काही कुटुंबांनी वास्तव्यास सुरुवात केली. कालांतराने ही वस्ती वाढत गेली असून आज येथे जवळपास २० ते २५ कुटुंबे राहतात. मात्र लोकसंख्या वाढली, वस्ती वाढली; पण मूलभूत सुविधा मात्र आजही पोहोचलेल्या नाहीत. उन्हाळा आणि हिवाळ्यात नागरिक नदीत भराव टाकून तयार झालेल्या तात्पुरत्या रस्त्याने ये-जा करतात. पण पावसाळा सुरू झाला ...

ना. पंकजाताईंचा कामाचा धडाका ; एकाच वेळी दोन बैठका केल्या अटेंड

इमेज
राज्यात पर्यावरण युक्त सण, उत्सव साजरे करण्यासाठी आगामी काळात महत्वाचा ॲक्शन प्लॅन आखला जाईल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला प्रत्यक्ष कृतीवर भर बीड दि. ३१ --- पुढील काळात राज्यात पर्यावरण युक्त आणि प्रदुषणमुक्त सण, उत्सव साजरे व्हावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे यासाठी महत्वाचा ॲक्शन प्लॅन आखून ठोस कृती केली जाईल अशी माहिती राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली.    पर्यावरण पूरक सण, उत्सव साजरे करणे आणि पीओपी मूर्तीचे विसर्जन करण्यासंदर्भात पर्यावरण विभागाची एक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ना. पंकजाताई मुंडे बोलत होत्या.    ना. पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या, पर्यावरण पूरक सण, महोत्सव साजरे करण्याबाबत 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते, त्या अनुषंगाने आमचा विभाग ठोस पावले उचलत आहे. जैविक दृष्ट्या विघटनशील मूर्ती व तांत्रिक विसर्जन प्रक्रिया यावर एक महत्वाचा ॲक्शन प्लॅन आ...

स्व.अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा सुनेत्रावहिनी समर्थपणे पुढे नेत आहेत !..

इमेज
नियोजन समितीच्या बैठकीत ना. पंकजाताई मुंडेंची जिल्ह्यासाठीची तळमळ सौहार्दपूर्ण वातावरण ठेवा, बीडची प्रतिमा जपा, विकासाला गती द्या स्व.अजितदादांच्या कार्यशैलीचा वारसा सुनेत्रावहिनी समर्थपणे पुढे नेत आहेत ! मतदारसंघात विकासाच्या त्रिसूत्री वर भर देण्याचे केले आवाहन बीड दि. ३१ --- राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि आपल्या  जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रावहिनी पवार या जबाबदारीने काम करत असून, दिवंगत अजितदादा यांच्या कार्याचा वारसा त्या समर्थपणे पुढे नेत आहेत. दादांच्या कामाची शैली आणि कामांचा धडाका त्यांच्यात दिसतो आहे अशा शब्दांत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्र्यांचे अभिनंदन केले. सौहार्दपूर्ण वातावरण ठेवा, जिल्ह्याची बदनामी होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असं सांगत जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन  त्यांनी केले.       जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या.  सुरुवातीला सुनेत्राताई पवार यांचे ना. पंकजाताईंनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत ...

एकदिवसीय आध्यात्मिक सहलीचा आनंद...

इमेज
  जिजामाता गार्डन हेल्थ क्लबची गुरुपौर्णिमा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी घेतला एकदिवसीय आध्यात्मिक सहलीचा आनंद परळी वैजनाथ | प्रतिनिधी       परळी वैजनाथ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या जिजामाता गार्डन हेल्थ क्लबतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक स्थळांना भेट देणारी एकदिवसीय आध्यात्मिक सहल उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली. या सहलीत ज्येष्ठ नागरिकांनी देवदर्शनासह संतांच्या समाधीस्थळांना भेट देत गुरुपौर्णिमेचा दिवस भक्तिभावाने साजरा केला.       क्लबचे अध्यक्ष ब्रिजलाल मुंदडा यांच्या प्रेरणेतून तसेच प्रतिष्ठित व्यापारी व क्लबचे दानशूर सदस्य बंडूसेठ गरूड यांच्या पुढाकाराने या सहलीचे आयोजन करण्यात आले. सहलीची सुरुवात श्री गरूड यांच्या "श्रद्धा वस्त्र भांडार" येथून झाली. गरूड परिवारातर्फे सर्व ज्येष्ठ नागरिकांचे गरमागरम कॉफीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर बालाजीराव डांगे यांच्या मिनी बसमधून सहलीस प्रारंभ झाला.       सर्वप्रथम श्रीक्षेत्र अंबाजोगाई येथे जाऊन श्री योगेश्वरी देवीचे दर्शन घेण्यात आले...