पोस्ट्स

इमेज
रांजणगावात कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११२ जणांची तपासणी रांजणगाव (संजय क्षिरसागर ) - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा रांजणगाव (शे.पुं.) यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्करोग जनजागृती व पूर्वतपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ११२ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.* महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी डॉ. अरविंद गायकवाड यांनी कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, लवकर निदानाचे महत्त्व आणि कर्करोगापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराला डॉ. खाडीलकर, भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखाध्यक्ष रमेश गायकवाड, रवि अवसरमोल, नागेश खंदारे, अविनाश सोनवने, पांडुरंग सातदिवे, वंदना दवणे, देवता बर्डे, निर्मला खंदारे यांच्...
इमेज
वाचन प्रेरणा दिनानिमित्त वैद्यनाथ महाविद्यालयात ग्रंथ परीक्षण वाचन स्पर्धा उत्साहात परळी वैजनाथ :येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ परीक्षण वाचन स्पर्धेचे आयोजन लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृहात करण्यात आले. या स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभागप्रमुख डॉ. व्ही. जे. चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड होते. स्पर्धेचे आयोजन ग्रंथपाल डॉ. एस. ए. धांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एस. सातपुते  यांनी केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांच्या सारांशाचे प्रभावी वाचन करून पुस्तकांमधील विचार, आशय आणि जीवनमूल्ये सादर केली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. ए. आर. चव्हाण आणि डॉ. एन. एम. आचार्य यांनी केले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राची दत्तू मोगले हिने मन्नू भंडारी यांच्या *‘आपका बंटी’* या कादंबरीच्या सारांश वाचनासाठी पटकावले. द्व...

विभागप्रमुखांना अंमलबजावणीचे निर्देश

इमेज
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत! ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून स्वेच्छेने योगदान देण्याचे शासनाचे आवाहन; विभागप्रमुखांना अंमलबजावणीचे निर्देश मुंबई : राज्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत स्वेच्छेने जमा करावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाने १६ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकाद्वारे केले आहे. राजपत्रित अधिकारी महासंघासह विविध कर्मचारी संघटनांनी या मदतकार्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर शासनाने हे आवाहन केले आहे. राज्यातील मंत्रालयीन विभाग, शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, मंडळे आणि सार्वजनिक उपक्रमांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वेतनातून कपातीसाठी स्पष्ट नियम शासन परिपत्रकानुसार,...

सुधारीत वेतनश्रेणी साठीच्या आंदोलनाला सुरुवात...

इमेज
राज्यभरातील न्यायालयात काळी फित लावून कामकाज सुधारीत वेतनश्रेणी साठीच्या आंदोलनाला सुरुवात मुंबई/प्रतिनिधी दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांसारखी सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासांठी महाराष्ट्रातील सुमारे ३४, ००० न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपाच्या पवित्र्यात आहेत. शासनाने मागणी मान्य न केल्यास १७ नोव्हेंबर २०२६ पासून महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघ गट 'क', लघुलेखक, बेलीफ व शिपाई संघटनांचे कर्मचारी संपावर जाणार असून याबाबतचे चारही महासंघाचे संयुक्त निवेदन व आंदोलनाची नोटीस प्रशासनास दिली आहे सदरील आंदोलन चारही महासंघाचे अध्यक्ष दिगंबर निकम, ढवळे, कुलकर्णी व मलघे यांच्या नेतृत्वात होत आहे. त्यानुसार मुंबई येथे नगर दिवाणी व सत्र न्यायालयात महासंघाच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली व अध्यक्ष सतीश मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आज  शासनाच्या या वेळकाढूपणाचा जाहीर निषेध म्हणून सर्व कर्मचारी यांनी आज काळी फित लावून कामकाज केले या आंदोलनात मुख्य कार्यालय तसेच दिंडोशी व माझगाव विभागातील उपस्...
इमेज
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा! माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांची मागणी; पाणी बचतीसाठी शहरातील बांधकामे बंद करण्याचीही सूचना परळी वैजनाथ : बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परळी शहरातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णतः माफ करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ केली आहे. त्याच धर्तीवर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या नागरिकांची घरपट्टी आणि पाणीपट्टीही माफ करावी. दुष्काळाच्या काळात करवसुलीचा तगादा लावण्याऐवजी प्रशासनाने नागरिकांच्या अडचणींचा विचार करावा, असे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे. शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणीही त्यांनी केली. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, असे त्यांनी नमूद केले. बांधकामे बंद करण्याची मागणी दुष्काळाच्या काळात पाण्...

भावपूर्ण श्रद्धांजली.....

इमेज
मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व हरपले; सौ. माधुरी इटके यांचे निधन महादेव दत्तात्रयअप्पा इटके यांना पत्नीशोक परळी वैजनाथ / प्रतिनिधी भाजपचे परळी शहर उपाध्यक्ष तथा वीरशैव सभा परळी तालुका अध्यक्ष महादेव दत्तात्रयअप्पा इटके यांच्या पत्नी आणि वैद्यनाथ विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षिका सौ. माधुरी महादेवअप्पा इटके यांचे आज 15 ऑक्टोबर रोजी रात्री 12.30 वाजता पुणे येथे उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने इटके परिवारासह वीरशैव लिंगायत समाजात हळहळ व्यक्त होत आहे. सौ. माधुरी वहिनी या मनमिळाऊ, सुस्वभावी आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित होत्या. इटके परिवारातील ज्येष्ठ सून म्हणून त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या अत्यंत आपुलकीने पार पाडल्या. घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक पाहुणचार करणे, सर्वांशी प्रेमाने संवाद साधणे आणि नात्यांमधील जिव्हाळा जपणे, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले होते. वीरशैव लिंगायत समाजातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यांतही त्...

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

इमेज
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाच्या कुटुंबाला एसबीआय चा एक कोटींचा आधार अपघाती मृत्यूनंतर दिवंगत सौदागर सावंत यांच्या वारसांना विमा मदत; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते धनादेश सुपूर्द परळी, प्रतिनिधी : कर्तव्यावर असताना नव्हे, तर अपघाती मृत्यूने अकाली काळाच्या पडद्याआड गेलेल्या पोलीस अंमलदाराच्या कुटुंबाला भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) सॅलरी पॅकेजअंतर्गत एक कोटी रुपयांची विमा मदत मिळाली आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दिवंगत सौदागर माणिकराव सावंत यांच्या वारस सुनंदा सावंत यांना १४ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सौदागर सावंत यांचा १६ जानेवारी २०२६ रोजी बीड शहरातील स्वराज्यनगर परिसरात सरस्वती शाळेजवळ स्कूटीचा ब्रेकरवर आदळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. कुटुंबाचा आधार हरपल्याने निर्माण झालेल्या आर्थिक संकटात बँकेच्या विमा संरक्षणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सॅलरी पॅकेजमुळे विमा संरक्षणाचा लाभ पोलीस कर्मचाऱ्यांच्या सॅलरी पॅकेज खात्याशी संलग्न विमा संरक्षणातून ही रक्कम मंजूर झाली. विमा मदतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी S...