अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसाधारण सभा..
पाणीटंचाईच्या नियोजनासह परळीच्या विविध विकास कामांना न. प.च्या सर्वसाधारण सभेत दिशा ! सभागृहात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, रस्ते विकास आणि पथविक्रेता आराखड्याबाबत निर्णय; नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या अभिनंदनाचा ठराव परळी वैजनाथ : प्रतिनिधी.... ना. पंकजाताई मुंडे व आ.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळी शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा उद्देश घेऊन नगरपरिषद काम करत आहे. आगामी काळात उद्भवू शकणारी पाणीटंचाई, शहरातील पायाभूत सुविधांचा विकास आणि नागरी प्रश्नांच्या निराकरणावर लक्ष केंद्रित करीत परळी वैजनाथ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेत पाणीटंचाई निवारण आराखडा, रस्ते विकास, घनकचरा व्यवस्थापन, पथविक्रेत्यांचे नियोजन आणि निवासी अतिक्रमणांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी परिस्थितीचा विचार करून...