पुण्यात माजलगावच्या तरुणांचा माणुसकीचा दिवा! लोकनेते स्व.अजितदादांच्या विचाराने गरजूंना 104 दिवाळी किटचे वाटप माजलगांव/प्रतिनिधी *पुणे:* दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण. पण हा आनंद फक्त आपल्या घरापुरता न ठेवता गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत पोहोचवण्याचे माणुसकीचे काम माजलगावच्या तरुणांनी करून दाखवले आहे. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या *"समानतेचा ध्यास, मानवतेचा विकास"* या विचारांनी प्रेरित होऊन द एपी फाउंडेशन (The AP Foundation) च्या माध्यमातून पुणे शहरातील विविध वाड्या-वस्त्यांमध्ये गरजू कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. यावर्षी पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याचे मोठ्या साहेबांनी व्यक्त केले होते. मात्र स्वर्गीय अजितदादांची विचारधारा जपणे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल. "स्वतः दिवाळी साजरी न करण्यापेक्षा गोरगरीब जनतेच्या घरात दिवाळी साजरी झाली पाहिजे, हीच स्वर्गीय दादांची इच्छा असती" या भावनेतून ही छोटीशी मदत म्हणून फाउंडेशन तर्फे *104 कुटुंबांना दिवाळी किट* देण्यात आले. या किटमध्ये दिवाळीसाठी लागणारे जीवनावश्यक साहित्य होते. पुण्यातील हातावर प...