लाल बावटा घर कामगार युनियनच्या वतीने कार्यक्रम.....
घरेलू कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव व अर्थिक मदत प्रदान प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षणाची तळमळ व गुणवत्ता प्रेरणास्पद – नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी लाल बावटा घर कामगार युनियनच्या वतीने परळी शहरातील नोंदणीकृत घरेलू कामगारांच्या दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच युनियनच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला ₹1,000 ची आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली. परळीतील जाजूवाडी जवळील सिटू कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. खाडे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करून आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितलेकी, घरेलू कामगार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कठोर परिश्रम ...