पोस्ट्स

इमेज
  आर्यवैश्य महिला मंडळाच्या नवरात्रोत्सवात नऊ दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी! तीन दशकांची परंपरा कायम; देवीची आकर्षक सजावट, भजन, जोगवा, गोंधळ आणि समूह नृत्याने उत्सवात रंगत परळी : महिलांची एकजूट, परस्पर सहकार्य आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचा जागर जपत परळीतील आर्यवैश्य महिला मंडळाच्या वतीने आर्यवैश्य मंगल कार्यालयात नवरात्रोत्सवानिमित्त सलग नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, देवीच्या विविध रूपांतील आकर्षक सजावट आणि बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नवरात्रोत्सवाला विशेष रंगत आली आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज एका विभागातील महिलांना देवीची विशेष सजावट करण्याची संधी दिली जाते. संबंधित विभागातील महिला एकत्र येऊन देवीला विविध रूपांत सजवतात. त्यानंतर सामूहिक आरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. भक्तिभावाने भारलेले वातावरण, देवीच्या जयघोषाने दुमदुमणारे मंगल कार्यालय आणि महिलांचा उत्साही सहभाग यामुळे उत्सवाचे धार्मिक महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे. देवीची भजने, जोगवा, गोंधळ, समूह नृत्य य...

संधीचा उपयोग परळीकरांच्या सेवेसाठी करू - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी

इमेज
परळीला राज्यस्तरावर गौरवास्पद प्रतिनिधित्व : नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचे मुंबईत शपथग्रहण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ- गव्हर्नमेंट नियामक मंडळावर बिनविरोध निवड परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :        परळी वैजनाथ च्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंट  (ऑल- एलएसजी) या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य नियामक मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईतील अंधेरी येथील संस्थेच्या मुख्यालयात शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा शपथग्रहण समारंभ पार पडला. या निवडीमुळे परळीला राज्यस्तरावर गौरवास्पद प्रतिनिधित्व मिळाले आहे. दरम्यान, या संधीचा उपयोग परळीकरांच्या सेवेसाठी करू अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी यांनी दिली आहे.       महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमधून नियामक मंडळाच्या दोन जागांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निवडणुकीसाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन उमेदवारा...

तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन, काटा व गव्हाण पूजन उत्साहात

इमेज
ओंकार साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू; आठ दिवसांत ऊसबिल देण्याची घोषणा बाबूराव बोत्रे-पाटील यांची ग्वाही; तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन, काटा व गव्हाण पूजन उत्साहात पांगरी, दि. १४ (प्रतिनिधी) : परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट क्रमांक ८ च्या २०२६-२७ या गाळप हंगामासाठी तृतीय बॉयलर अग्निप्रदीपन, काटा पूजन आणि गव्हाण पूजन-मोळीचा कार्यक्रम ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. आगामी हंगामात ऊसाला उच्चांकी दर देण्यासह ऊस गाळपास आल्यानंतर आठ दिवसांत ऊसबिल अदा करण्यात येईल, अशी घोषणा बोत्रे-पाटील यांनी यावेळी केली. कार्यक्रमाला ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस्विनी बर्गे, परळी तालुका भाजपाध्यक्ष राजेश गित्ते, शहराध्यक्ष नितीन समशेट्टी, पांगरीचे पोलीस पाटील ज्ञानोबा माऊली मुंडे, ऊस उत्पादक रमेश घोडके, विष्णू तांबडे, तोडणी-वाहतूक ठेकेदार समशेर अब्दुल शेख, राजेभाऊ राठोड, कारखान्याचे अधिकारी सागर मार्तंडे आदी उपस्थित होते. दुष्काळात रोजगाराची संधी यावेळी बोलताना राजेश गित्ते यांनी, मराठवाड्यात दुष्काळी पर...
इमेज
  पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांची जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर  अधिकाऱ्यांशी चर्चा पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, शेतकऱ्यांना मदतीबरोबरच दुष्काळ निवारणासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश *गांव दत्तक अभियानांतर्गत सर्वांगीण विकासासाठी अंतरवाली सराटी गाव घेतले दत्तक ; पुढील महिन्यात गावास भेट देणार*  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सामुहिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन द्या जालना,दि. १६ --- जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पीक पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे निर्देश राज्याच्या  पर्यावरण व पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज दिले. गांव दत्तक अभियानांतर्गत सर्वांगीण विकासासाठी अंतरवाली सराटी दत्तक घेत असल्याचे सांगून पुढील महिन्यात आपण या गावास  भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.    पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे आज जालना दौऱ्यावर होत्या, जिल्हाधिकारी कार्यालयात विभाग प्रमुखांच्या...
इमेज
ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित भगवान भक्तिगड सावरघाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहा -राजेश गित्ते परळी वैजनाथ (प्रतिनिधी )--- राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जन्मभूमीत सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर  होणाऱ्या दसरा मेळाव्याची दरवर्षीच उत्सुकता असते. लाखोंची गर्दी हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य असते.  राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या दसरा मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी वैजनाथ भाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते यांनी केले.          भगवान भक्तीगडावर  होणारा दसरा मेळावा वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून या दसरा मेळाव्याची ओळख आहे.राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो.यंदाचा दसरा मेळावा २० ऑक्टोबर रोजी असणार आहे.या दसरा मेळाव्यात ना. पंकजाताई मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थक लाखोंच्या संख्येने भगव...
इमेज
रांजणगावात कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ११२ जणांची तपासणी रांजणगाव (संजय क्षिरसागर ) - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा रांजणगाव (शे.पुं.) यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्करोग जनजागृती व पूर्वतपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ११२ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.* महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी डॉ. अरविंद गायकवाड यांनी कर्करोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, लवकर निदानाचे महत्त्व आणि कर्करोगापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराला डॉ. खाडीलकर, भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखाध्यक्ष रमेश गायकवाड, रवि अवसरमोल, नागेश खंदारे, अविनाश सोनवने, पांडुरंग सातदिवे, वंदना दवणे, देवता बर्डे, निर्मला खंदारे यांच्...
इमेज
वाचन प्रेरणा दिनानिमित्त वैद्यनाथ महाविद्यालयात ग्रंथ परीक्षण वाचन स्पर्धा उत्साहात परळी वैजनाथ :येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ परीक्षण वाचन स्पर्धेचे आयोजन लोकनेते गोपीनाथराव मुंडे सभागृहात करण्यात आले. या स्पर्धेत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभागप्रमुख डॉ. व्ही. जे. चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड होते. स्पर्धेचे आयोजन ग्रंथपाल डॉ. एस. ए. धांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी. एस. सातपुते  यांनी केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांच्या सारांशाचे प्रभावी वाचन करून पुस्तकांमधील विचार, आशय आणि जीवनमूल्ये सादर केली. स्पर्धेचे परीक्षण प्रा. ए. आर. चव्हाण आणि डॉ. एन. एम. आचार्य यांनी केले. स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्राची दत्तू मोगले हिने मन्नू भंडारी यांच्या *‘आपका बंटी’* या कादंबरीच्या सारांश वाचनासाठी पटकावले. द्व...