पेठ बीड पोलिसांची मोठी कारवाई;
जनावरे चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड ३ लाख किमतीची स्कॉर्पिओ जप्त बीड: पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोबा गल्ली येथून स्कॉर्पिओ वाहनातून गोवंश जातीची जनावरे चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीला पोलिसांनी सिनेमॅटिक पाठलाग करून अत्यंत शिताफीने अटक केली आहे. दिनांक २३ मे २०२६ रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, पोलिसांनी या टोळीतील तीन अट्टल चोरांना जेरबंद केले असून गुन्ह्यात वापरलेले ३ लाख रुपये किमतीचे काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी ६ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी तात्काळ तपास चक्र फिरवली होती. तपास पथकाने बीड शहरातील ४० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक संशयित काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आढळून आली, मात्र तिचा नंबर प्लेट स्पष्ट नव्हता. पोलिसांनी तब्बल १९० किलोमीटरपर्यंतचे कॅमेरे आणि टोल नाके तपासले, तेव्हा आरोपींनी वारंवार नंबर प्लेट बदलून प्रवास केल्याचे समोर आले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पोलीस पथक मालेगाव आणि त्यानंतर सिल्लोड येथे पोहोचले. तेथे पळून जाण्याच्या तयारीत अ...